विजय जुंजारे/प्रतिनिधी
रिसोड शहरात सध्या घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ, तसेच उपनगरांमध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढीग पडून आहेत. या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून परिसरात दुर्गंधीचा त्रास वाढला आहे.
नागरिकांच्या मते, गेल्या अनेक दिवसांपासून शहरात झाडू कामगार दिसलेले नाहीत. कचरा वेळेवर उचलला जात नाही, आणि काही भागात तर डब्बे भरून वाहतूक थांबली आहे. या निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त झाले असून नगर परिषदेबद्दल संताप व्यक्त करत आहेत.
हेही वाचा.
“भाजपाला कुबड्यांची गरज नाही” – Amit Shah On Mahayuti | महाराष्ट्रात BJP चा पॉवरफुल इशारा!
स्थानिकांनी सांगितले की, प्रशासनाने वेळेवर स्वच्छतेची कामे केली असती तर आज परिस्थिती एवढी बिकट झाली नसती. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढू नये यासाठी तातडीने स्वच्छतेची मोहीम हवी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नगरपरिषद प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.















