Risod : रिठद परिसरात पाण्याची दमदार हजेरी.

Risod

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरू पाटील 

 

आज दिनांक १९/१०/२०२४ रिसोड (risod) तालुक्यातील गाव परिसरात असलेल्या बेलखेडा, येवती खडकी ढंगारे, पारडी तिखे, हिवरापेन, आसेगाव पेन, कोयाळी भिसडे, कोयाळी शिरसाट,वरुड तोफा, वनोजा या सर्वच गावांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली असून विजेच्या कडकडासह पाऊस बरसत आहे. सध्या स्थितीत सोयाबीन काढणी चालू असून शेतीमध्ये रब्बीची पीकासाठी मशागत करणे चालू आहे दरम्यान पाच- दहा टक्के शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा हरभऱ्याची केली आहे. परंतु या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली.

 

 

 

पेरलेल्या हरभऱ्याचे गतवर्षी सारखे नुकसान होणार आहे व हा हरभरा बुरशी लागल्याप्रमाणे जळत जाणार? आणि ह्या बाबी उशिरा लक्षात येणार? त्यामुळे येरे माझ्या मागल्या असे शेतकऱ्याचे होऊ नये. तर सोयाबीन काढणीचे थ्रेशर सध्या स्थितीत शेतात असून अशा पावसामुळे शेतकऱ्यांच्या कामाचा खोळंबा झाला आहे हा पाणी तुर पीकासाठी हा पाऊस लाभदायक आहे.