
वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील
washim : आपल्या आई वडिलांना माहिती न करता दोन अल्पवयीन मुलांनी कार चालविण्यासाठी घेतली अन अपघात करून बसले. सुदैवाने कुणाच्याही जीवाला गंभीर हानी पोहचली नाही. ही घटना ९ ऑक्टो.रोजी वाशिम ते किन्हीराजा मार्गावरील तोरणाळा गाव नजदीक ‘शिंदे फार्मसी कॉलेजच्या’ जवळ घडली. सविस्तर वृत्त असे की, वाशिम washim तालुक्यामधील कोंडाळा झामरे या गावांमध्ये पाहुणे मंडळी आली होती. त्या पाहुण्यांच्या लेकरांनी आपली कार आई वडिलांच्या माघारी खेळण्यासाठी म्हणून घेऊन गेले. परंतु त्यांना कार चालविण्याचा कोणताही अनुभव नव्हता तथापि त्यांचे सोबत एखादा अनुभवी व्यक्ती सुद्धा नव्हता.
आई वडील आपल्याला कार चालवण्यासाठी देणार नाहीत याची त्यांना संपूर्ण कल्पना असल्यामुळे त्यांनी सर्वांच्या नजर चुकवून ब्रिजा कंपनीची कार कोंडाळा ते किन्हीराजा या मार्गावर चालविण्यासाठी घेऊन गेले. ही कार चालवतांना त्यांना कार चालवण्याचा अनुभव नसल्याकारणाने त्यांचा स्टेरिंग वरील ताबा सुटला. त्यानंतर या कारणे तीन पलट्या घेतल्या आणि कार थेट विजेच्या खंब्यावर जाऊन चढली. या कार मधील जीवन सुरक्षा असलेल्या दोन्हीही एअरबॅग उघड्या झाल्यामुळे दोनहीं मुलाला गंभीर दुखापत झाली नाही. हा विचित्र अपघात घडल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना कार बाहेर काढले. त्यानंतर ही माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळविली. या दोन मुलांपैकी एका मुलाला किरकोळ मार लागल्यामुळे त्याला वाशीम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही कार विजेच्या खांबावर चढलीच कशी ? हा प्रश्न अपघात बघण्यासाठी जमलेल्या सर्व ग्रामस्थांना पडलेला आहे. हे उल्लेखनीय.