
नारायणराव आरु पाटील/प्रतिनिधी
मेहकर (mehkar) पंचायत समीतीमध्ये जनतेच्या मनातील पंचायत विभागाशी निगडीत असणारे आणी जनतेच्या मनात घर करुन नौकरी करत असलेले व शासकीय नौकरी कधी संपली यांचेही जनतेला व कार्य करत असलेल्या अधिकाऱ्यांना लोकांच्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रेमामुळेच सेवानिवृत्तीचा दिवस कधी आला कळलेच नाही.अशा सुस्वभावी सेवानिवृत्त पंचायतचे विस्तार अधिकारी जे.जे. आरु,हे मुळ रिठद ता . रिसोड येथील रहिवासी आहेत.
यांनी संपूर्ण नौकरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर पंचायत समीतीमध्ये निवृत्त होईपर्यंत केली. या अधिकाऱ्यांचा आज दि.२३/८/२०२४ रोजी मेहकर पंचायत समितीच्या कार्यालयात सुरेशभाऊ मवाळ ग्रामसेवक आणी माजी पंचायत समिती सदस्या सौ.वर्षाताई मवाळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आमदार संजयजी रायमुलकर,अध्यक्ष पंचायत राज समीती महाराष्ट्र राज्य तर प्रमुख अतिथी मा.ए.पी.पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वी.)जिल्हा परिषद बुलढाणा,आणी मा.एस.ए.इंगळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)जिल्हा परिषद बुलढाणा.
यावेळी आमदार संजय रायमुलकर यांनी जे.जे आरु व सेवानिवृत्त अधिकारी आणी पत्नी गीताबाई आरु यांचा सपत्नीक सत्कार केला.व पूढील वाटचालीसाठी व आरोग्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी मेहकर पंचायत समितीचे सहा.गटविकास अधिकारी, ग्रामसेवक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष,सचीव, अध्यक्ष सरपंच संघटना मेहकर, बुलढाणा ग्रामसेवक पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक व हितचिंतक मंडळी उपस्थित होती.