रिसोड,वाशिम |२६ मार्च २०२६
रिसोड आत्महत्या बातमी : वाशीम जिल्ह्यातील रिसोड शहरात १७ वर्षीय युवती आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिसोड आत्महत्या बातमी परिसरात वेगाने पसरली असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. १७ वर्षीय युवती आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका रमेश पवार (वय १७) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. दिनांक २४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना रिसोड शहरातील कदम मळा येथे उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
घटनेच्या वेळी प्रियंका घरात एकटीच होती. घरातील इतर सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. याच दरम्यान तिने घराच्या अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रिसोड पोलीस पुढील तपास करत आहेत.
संबंधित बातम्या
- देशसेवेची सुवर्णसंधी! CRPF-BSF-ITBP मध्ये 55 हजार मेगा भरती; 53 नवीन बटालियन प्रस्तावित
- नागपूरात RSS मुख्यालयावर जनआक्रोश मोर्चा; प्रकाश आंबेडकरांचा मोदी-भागवतांना थेट सवाल
- गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा














