हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धक्कादायक! राजेगावमध्ये शेतातून 1.43 लाखांचे पाळीव प्राणी चोरी; शेतकऱ्यांमध्ये भीती

On: March 24, 2026 7:47 AM
Follow Us:
राजेगाव येथे शेतातून म्हशी व शेळी चोरीची घटना

साखरखेर्डा (वार्ताहर)|२४ मार्च २०२६

बुलढाणा जिल्ह्यातील राजेगाव येथे घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका शेतातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 1 लाख 43 हजार रुपये किंमतीचे पाळीव प्राणी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना शेंदुर्जन ते सुलतानपूर रोडवरील राजेगाव परिसरात घडली असून, अरविंद मधूकर तांगडे यांच्या शेतातील गोठा फोडून चोरी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी, एक वगार, एक शेळी आणि दोन पिल्ले अशी एकूण सहा पाळीव प्राणी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास वाहनातून चोरून नेली.

चोरट्यांनी गोठ्याचे कुलूप आणि कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि काही मिनिटांतच संपूर्ण जनावरे लंपास केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी 23 मार्च रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रामदास वैराळ करीत आहेत.

महत्त्वाचे: ग्रामीण भागात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शक्यतो सीसीटीव्ही कॅमेरे, मजबूत कुलूप आणि शेजारील शेतकऱ्यांमध्ये संपर्क ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


Related News


हे आवश्यक करा 
अशाच ताज्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत रहा. ही बातमी शेअर करून इतर शेतकऱ्यांनाही सतर्क करा.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

Leave a Comment