मुंबई |२७ फेब्रुवारी २०२६
Railway Police Bharti Mumbai भरती प्रक्रियेसाठी गेलेल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील railway police recruitment ground test पूर्ण केल्यानंतर बावनबीर येथील युवकाला अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाला. सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेलेल्या या उमेदवाराच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून (police bharti news) Maharashtra मध्ये ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.
विश्रांती घेत असताना अचानक त्याला फिट आली आणि तो बेशुद्ध पडला. मित्रांनी तत्काळ त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद पंतनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारीरिक चाचणीदरम्यान त्याने १०० मीटर ते १,६०० मीटरपर्यंत धाव घेतली होती आणि सकाळी ११:३८ वाजता तो भरती परिसरातून बाहेर पडला.
त्यानंतर साईबाबा मंदिरात विश्रांती घेत असताना त्याला भोवळ येऊन तो कोसळला. मुंबईत शवविच्छेदनानंतर २५ फेब्रुवारी रोजी बावनबीर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण व मोठा आप्तपरिवार आहे. त्याच्या अचानक निधनाने गावात शोककळा पसरली असून नागरिकांकडून भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या आरोग्य सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची मागणी होत आहे.
👉 संबंधित बातम्या
- मोताळा हादरला! मलकापूर रोडवरील भीषण अपघातात 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
- मुंबई आंदोलनस्थळी आमदार श्वेताताई महाले पाटील; संगणक परिचालकांच्या प्रश्नांवर दिले मोठे आश्वासन
- चिखला प्रकरण तापले! संभाजी व जिजाऊ ब्रिगेडची धडक एन्ट्री; पीडितांना न्याय देण्याची जोरदार मागणी
📲 ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.
👉 ही बातमी शेअर करा — माहितीच सुरक्षिततेचे पहिले पाऊल आहे.










