हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
Ladki Bahin Yojana : 18 नोव्हेंबरपूर्वी नाही केलं हे काम तर कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या युवा शेतकऱ्या१६ वर्षीय सोहम गायकवाडचा हृदयविकाराने मृत्यआजचे राशिभविष्य (Today Rashi Bhavishya in Marathi) | 1 नोव्हेंबर 2025 | सारंगवाडी तलावात कोट्यवधींचा महाघोटाळा! 16 कोचिखलीत मुख्यमंत्री फडणवीसांची गगनभेदी सभा; श

सामान्य शेतकरी ते जनतेचा आवाज! नागेशभाऊ गंगावणे बनले प्रेरणास्थान

On: November 3, 2025 7:03 AM
Follow Us:

नारायणराव आरू पाटील/वाशिम

वाशिम जिल्ह्यात आज एक नाव सर्वत्र चर्चेत आहे — नागेशभाऊ गंगावणे. गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले नागेशभाऊ गंगावणे हे आज जनतेचा आवाज म्हणून ओळखले जातात.

समाजसेवा, ग्रामविकास आणि शेतकऱ्यांसाठी लढणारे नागेशभाऊ गंगावणे हे एक खरे शेतकरी नेता आहेत. त्यांच्या कार्यामुळे नागेशभाऊ गंगावणे हे नाव आज वाशिम जिल्ह्यात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून घेतलं जातं.

ते फक्त शेतकरीच नाहीत तर समाजहितासाठी काम करणारे लोकनायक आहेत. त्यांनी स्वतःच्या मेहनतीने लोकांच्या मनात जागा मिळवली आहे.

नागेशभाऊ गंगावणे यांनी छोटेखानी नाश्ता सेंटर सुरू केलं, पण ते फक्त व्यवसाय नव्हतं. त्यांच्या या सेंटरवर लहान मुलांना मोफत नाश्ता दिला जातो, आणि गरजू, दिव्यांग किंवा गरीब व्यक्तीकडून पैसे घेतले जात नाहीत. त्यांच्या या संवेदनशील कृतीमुळे लोकांच्या हृदयात त्यांच्याबद्दल आदर वाढला आहे.

हे पण वाचा.

रिसोड तालुक्यात बूथ वाढ! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत १६ नवीन मतदान केंद्रांची निर्मिती.

२०१८ पासून कोणत्याही पदावर नसताना त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न थेट सरकारसमोर मांडले. इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आणि बेरोजगार युवकांचे मुद्दे समाजापर्यंत पोहोचवले. मोर्चे, आंदोलने आणि जनआंदोलनांद्वारे त्यांनी नेहमी लोकांसाठी लढा दिला आहे.

त्यांचा स्वभाव साधा, जमिनीवरचा आणि प्रामाणिक आहे. गावोगावी जाऊन लोकांचे प्रश्न ऐकणं, प्रशासनासमोर ठामपणे मांडणं आणि गरजूंना मदत करणं हे त्यांचं रोजचं काम आहे. लोक म्हणतात — “सत्तेत नसताना एवढं काम करणारा माणूस, सत्तेत आल्यावर विकासाची नवी उंची गाठेल.”

आता नागेशभाऊ गंगावणे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत. त्यांना मिळत असलेला लोकांचा पाठिंबा आणि विश्वास पाहता ते वाशिम जिल्ह्याचे नवे प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांनी सिद्ध केलं आहे की लोकसेवा ही पदासाठी नव्हे तर मनासाठी करायची असते.

त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे, गरीबांविषयीच्या संवेदनशीलतेमुळे आणि सतत समाजासाठी लढण्याच्या वृत्तीमुळे नागेशभाऊ गंगावणे आज वाशिमचा खरा जनतेचा आवाज बनले आहेत.

महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपल्या kattanews.in या न्यूज पोर्टलला भेट द्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!