Mukhymantri mazi shala : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा- टप्पा २

 

नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी

 

संपूर्ण महाराष्ट्रभर मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा, टप्पा दोन मध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्रातील ज्या शाळा स्पर्धेसाठी पात्र यादीमध्ये समाविष्ट टप्पा दोन मध्ये समाविष्ट होतील आणी टप्पा क्रमांक दोन मध्येसाठी संकल्पना चालू असून ज्या शाळेने ऑनलाईन कामे टाकली. सुंदर शाळा बनवण्यासाठी त्याबाबत केंद्रस्तरीय पडताळणी रिसोड तालुक्यात चालू असून त्याबाबत रिठद केंद्रातील केंद्रप्रमुख हनुमान बोरकर व त्यांचे सहकारी हेंबाडे गुरुजी हे वनोजा येथे शाळा तपासणी करता आले असतांना याबाबत सर्व माहिती त्यांनी मुख्याध्यापका कडून घेतली.

 

 

 

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा , टप्पा दोन मध्ये शासकीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व खाजगी शाळा यामध्ये स्पर्धा निर्माण झाली असून जिल्हा परिषदेची शाळा व खाजगी शाळा यासाठी तालुक्यामध्ये प्रत्येकी प्रथम क्रमांक देण्यात येणार आहे. त्यानंतर खाजगी आणि जिल्हा परिषद शाळा यांच्यामध्ये निवड होणार आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या शाळेला ५१ लाख रुपये जिल्हास्तरावर ११ लाख रुपये व तालुकास्तरावर ३ लाख रुपये शाळेला पारितोषिक मिळणार आहे.

 

 

 

अशी माहिती केंद्रप्रमुख हनुमान बोरकर, सहकारी हेंबाडे गुरुजी वनोजा येथे केंद्रस्तरीय पडताळणी संदर्भात आले असतांना ही माहिती दिली. वनोजा शाळेचे मुख्याध्यापक संतोष सराफ यांनी प्रथम मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी वसंता शिरसाठ, संजय आरू, अरुण तुरुकमाने ,राजेंद्र गिरी भूषण देशमुख इत्यादी शिक्षक मंडळी यावेळी उपस्थित होती,