
नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी
नितेश राणे यांनी १ सप्टेंबर रोजी अहमदनगर येथील कार्यक्रमात मुस्लिम समाजा विरोधात वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा महाराष्ट्रातील संपूर्ण मुस्लिम समाजामध्ये रोष पसरला असून त्याबाबतचे मुस्लिम समाजाबाबत भर सभेत गांडू शब्द उच्चारल्याने आणि प्रार्थना स्थळांमध्ये घुसून मारू अशा धमक्या दिल्या. त्यामुळे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण करणे असे वक्तव्य केल्याने मुस्लिम समाजाप्रती असलेला द्वेष निर्माण करणे अशा व्यक्तीला कायद्याचा धाक नसल्याने,जातीय तेढ निर्माण करणे,धार्मिक भावना दुखावने या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करावी.
याबाबतचे निवेदन रिसोड शहर वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने पोलीस स्टेशन ठाणेदार रिसोड यांना यावेळी शहराध्यक्ष मोहम्मद आसिफ नूर मोहम्मद व तालुकाध्यकाध्यक्ष सैय्यद अकील व इतर वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.