Washim : चोरीच्या ३ मोटार सायकल २४ तासांच्या आत हस्तगत रिसोड पोलिसांची कारवाई.

 

 

नारायणराव आरु पाटील/वाशीम जिल्हा प्रतिनिधी

 

चोरीला गेलेली मोटरसायकल २४ तासाचा आय हस्तगत केल्याची कारवाई रिसोड पोलिसांनी केली आहे. रिसोड पोलिसांनी ३ मोटरसायकल किंमत दीड लाख रुपये हस्तगत केले आहे.याबाबत माहिती अशी की दिनांक १९ सप्टेंबर रोजी दुपारी १ दरम्यान रिसोड येथील गुरांच्या बाजारात हिंगोली जिल्ह्यातील म्हाळशी येथील येथील नवाज खान हे आपल्या कामानिमित्त गुरांच्या बाजारात आले असता त्यांनी आपली मोटरसायकल एम एच ३७ एच ७५११ ही रस्त्याच्या बाजूला उभी केली होती, मात्र जेव्हा ते परत आले त्यावेळेस त्यांची दुचाकी ही त्या ठिकाणी नसल्याचे निदर्शनात आले.

 

 

याप्रकरणी त्यांनी रिसोड पोलिसात तक्रार दाखल केली असता रिसोड पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपासाचे चक्रे फिरवत डी बी पथकाने १९ सप्टेंबरच्या रात्री दहा वाजता जालना जिल्ह्यातील सेवली येथील निहाल अहमद ग्यासोददीन अन्सारी वय २३ वर्षे यास विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली व चोरी केलेली नवाज खान यांची दुचाकी व अन्य दुचाकी ज्या त्याने संभाजीनगर येथून चोरी केलेल्या दोन दुचाकी एक काळया रंगाची होण्डा शाईन कंपनीची मोटार सायकल एमएच १५-६०१४ व एक काळया रंगाची स्प्लेंडर कंपनीची मोटार सायकल क्र. एमएच १७ एक्स ८९३४ रिसोड पोलिसांच्या सुपूर्द केल्या.

 

 

 

हस्तगत केलेल्या तीनही दुचाकीची किंमत दीड लाख रुपये असल्याची माहिती रिसोड पोलिसांनी दिली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे,अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम निलीमा आरज यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांचे नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर नागरे, पोलीस हवालदार श्रीकृष्ण नागरे, पोलीस अंमलदार रवि अढागळे, विनोद घनवट, परमेश्वर भोणे यांनी केली .