मेहकर | १३ फेब्रुवारी २०२६
रनिंगचा सराव करत असताना १९ वर्षीय युवकाचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सारशिव गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत युवकाचे नाव दीपक रामदास जाधव (वय १९, रा. सारशिव) असे आहे. मुंबई येथे ग्राउंड असल्याने तो पूर्वतयारीसाठी सारशिव फाटा ते मंगरूळ नवघरे परिसरात नियमित रनिंगचा सराव करत होता. मात्र सरावादरम्यान अचानक त्याला छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या.
घटनेनंतर त्याला तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मित्रपरिवार आणि गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.
दीपक हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील व दोन बहिणी असा परिवार आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
🔴 Related News:
- चिखली-बुलढाणा रोडवर भीषण अपघात! परीक्षेला निघालेल्या 23 वर्षीय युवकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
- ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीवर मोठी मागणी; कार्यरत सरपंचांनाच संधी द्या – आ. श्वेताताई महाले पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
👉 अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.














