manoj jarange patil : जर सरकार आपल्यावर अन्याय करणार असेल, चारही बाजूने मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असेल, हक्काचे ‘आरक्षण’ द्यायचे नाही ठरवले असेल तर आम्हाला पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार आहे. ज्या क्षेत्रात आम्हाला जायचे नाही, पण तिथे जायची वेळ सत्ताधारी विरोधकांमुळे आमच्यावर आली. माझ्या समाजाचे हित कशात हे बघावे लागणार आहे. लवकरच यावर निर्णय होणार आहे असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील manoj jarange patil यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील manoj jarange patil म्हणाले की, गर्वाला कधी वाढ नसते, कधी ना कधी संपतोच. लोकसभेला जे झाले त्यापेक्षा ५ पटीने विधानसभेत होईल. मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्न सरकारला आला आहे. मराठा कुणबी एकच आहे, मराठ्यांवर जाणुनबुजून अन्याय करत आहात. सारथीच्या कोणत्या सवलती आम्हाला कामी येतात, सगळ्या मुलींना मोफत शिक्षण मग फी का घेतली, मी पावत्या देतो. अर्धवट गुंतवणूक ठेवायचे. प्रवेशासाठी पैसे घेताय. त्यामुळे सरकारवर सर्व समाजातील लोक नाराज होऊ लागलीत असे त्यांनी म्हटले. तसे लिंगायत, धनगर, मुस्लीम समाजालाही मिळायला हवे ही प्रामाणिकपणाची भावना आहे. बारा बलुतेदाराची वेगळ्या प्रवर्गाची मागणी आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे.