
buldhana news| अल्पवयीन मुलीचा छळ केल्याच्या कारणाने शिक्षकास अटक. चौथ्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा दि. ३ एप्रिल रोजी लैंगिक – छळ करून पसार झालेल्या शिक्षकास तब्बल पावणे दोन महिन्यानंतर बुधवारी, दि. २९ बोराखेडी पोलिसांनी – अटक केली आहे. दरम्यान, त्याला – न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एका दिवसाची – पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जिल्हा परिषदच्या – शाळेत शिक्षक असलेल्या दिलीप मोतीराम जाधव या शिक्षकाने ३ एप्रिल रोजी सकाळी त्यांच्याच वर्गात शिक्षण घेत असलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ केल्याचा आरोप करीत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर सदर शिक्षक पसार झाला होता.
दरम्यान, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर तब्बल पावणे दोन महिन्यानंतर बोराखेडी पोलिसांनी त्या शिक्षकास ताब्यात घेत न्यायालयात हजर केले.