
महाविकास आघाडीचा २६० जागांचा तिढा सुटला ; पण राहिलेल्या २८ जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरु ! महाविकास आघाडीला mahavikas aghadi महाराष्ट्रातील २८८ पैकी २६० जागांवरील तिढा सोडवण्यात यश आले आहे. पण या आघाडीतील तिन्ही मित्रपक्षांत २८ जागांवर कमालीची रस्सीखेच सुरू असल्यामुळे जागावाटपाची चर्चा अजून लांबण्याची भीती निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या vidhansabha election घोषणेनंतर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची सातत्याने बैठक सुरू आहे.
मुंबईच्या mumbai सोफिटेल हॉटेलला झालेल्या मविआ नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत २६० जागांचा ‘तिढा’ सुटलेला आहे. उर्वरित २८ जागांवर तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच आहे. मविआचे जागावाटप फायनल करून १-२ दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीपूर्वी मविआत २०० जागांवर एकमत झाले होते, विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे तिन्ही पक्षातील जागावाटप लवकर सुटावे, यासाठी सकाळपासून मविआ नेते बैठकीला बसले आहेत. या बैठकीत संजय राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, सतेज पाटील आणि इतर नेते उपस्थित आहेत.
मुंबईतील ३३ जागांवर एकमत
■ मुंबईतील ३६ पैकी ३३ जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. त्यात काँग्रेस १५, ठाकरेसेना १८ आणि राष्ट्रवादी २ आणि समाजवादी पार्टीला १ जागा देण्यावर सहमती झाली आहे. त्याशिवाय कुर्ला, भायखळा आणि अणुशक्तीनगर या जागांवर अद्याप पेच आहे. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर होऊ शकते असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते.
काँग्रेसची पहिली यादी २० ऑक्टोबरला
काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी २० ऑक्टोबरला येणार आहे. ८४ जागांबाबत उमेदवारी निश्चित झाली असून २० तारखेला पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. त्याचदिवशी उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते.