
pavitra portal : पवित्र पोर्टलच्या pavitra portal माध्यमातून सध्या शिक्षक भरती सुरू आहे या भरतीमध्ये सेमी इंग्रजी semi english माध्यमासाठी निवड झालेल्या शिक्षकांची कौशल्य चाचणी करण्यात येणार आहे त्यानंतरच या शिक्षकांना सेवेत कायम करण्यात येणार आहे इतर शिक्षण सेवकांची मात्र कुठलीही परीक्षा घेण्यात येणार नसल्याचे पवित्र पोर्टलवर १४ सप्टेंबरच्या प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे पवित्र पोर्टलच्या pavitra portal माध्यमातून सध्या शिक्षक भरती सुरू आहे जिल्ह्यात आतापर्यंत २६५ शिक्षक सेवकांची निवड झाली आहे तीन वर्षांनतर शिक्षण सेवकांना नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी त्यांची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने एक परीक्षा घेण्यात असल्याचे समोर आले होते.
शिक्षण सेवक परीक्षेत उत्तीर्ण झाले तरच त्यांना नोकरीत कायम केले जाणार असल्यामुळे शिक्षक सेवकांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. नोकरीत टिकून राहण्यासाठी आणखी किती परीक्षांना सामोरे जावे लागणारआहे, असा प्रश्नच शिक्षण सेवक उपस्थित करू लागले होते मात्र, पवित्र पोर्टलवर pavitra portal १४ सप्टेंबर रोजी एक परिपत्रक काढून केवळ सेमी इंग्रजी माध्यमासाठी निवड झालेल्या शिक्षण सेवकांचीच ‘परीक्षा’ घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शिक्षक परिषद घेणार परीक्षा
सेमी इंग्रजी माध्यमासाठी निवड झालेल्या शिक्षकांची महाराष्ट्र शिक्षक परिषद घेणार आहे त्याविषयी प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी माहिती देण्यात आलेली आहे.
शिक्षण सेवक रद्द करण्याची होतेय मागणी
नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक सेवक हे पद रद्द करण्यात आले आहे तसेच शिक्षक सेवक कालावधीत या शिक्षकांना कुठलेही लाभ मिळत नाही त्यामुळे, शिक्षण सेवक पद रद्द करावे किवा कालावधी कमी करण्याची मागणी होत आहे