हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

दगडवाडीत खळबळ! पहाटे घराबाहेर आढळला शेतकऱ्याचा मृतदेह

On: July 26, 2026 8:38 AM
Follow Us:
दगडवाडी देऊळगाव राजा येथे शेतकरी नंदाजी घुगे मृतावस्थेत आढळल्याची घटनास्थळाची प्रतिमा

देऊळगाव राजा|राहुल नायर

देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी येथे एका शेतकऱ्याचा मृतदेह घराच्या मागील बोळीत आढळल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. नंदाजी दुर्योधन घुगे (वय ४७) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, शुक्रवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

प्राथमिक अंदाजानुसार भिंतीवरून खाली पडल्याने डोके आणि मानेला गंभीर दुखापत झाल्याने नंदाजी घुगे यांचा मृत्यू झाला असावा. देऊळगाव राजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदाजी घुगे गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत घरातच होते. रात्रीचे जेवण झाल्यानंतर कुटुंबीय नेहमीप्रमाणे झोपी गेले. मात्र शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास शेजारी राहणारे योगेश शिवाजी घुगे यांना नंदाजी घराच्या मागील बोळीत पडलेले दिसले. ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ घुगे कुटुंबीयांना याची माहिती दिली.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय धावतच घटनास्थळी पोहोचले. मात्र नंदाजी यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. काही वेळातच पोलीस व वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळावरून पोलिसांनी नंदाजी घुगे यांना तातडीने देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. नंदाजी यांचे जुळे बंधू सुभाष दुर्योधन घुगे यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली, त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

देऊळगाव राजा पोलीस ठाण्याने या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनेमागील नेमके कारण आणि परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे दगडवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

📲 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या
✅ आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा »

राहुल नायर

राहुल नायर हे KattaNews.in चे पत्रकार असून महाराष्ट्रातील स्थानिक बातम्या, सामाजिक घडामोडी, सरकारी योजना, शेती, शिक्षण आणि राजकीय विषयांचे अचूक, विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ वृत्तांकन करतात. तथ्य पडताळणी, संतुलित पत्रकारिता आणि वाचकांना उपयुक्त माहिती जलद पोहोचवणे यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा धाड पोलीस स्टेशन हद्दपार कारवाई रोशन गणेश शिंदे

बुलढाणा: गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 21 वर्षीय तरुणाला जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार, पोलिसांची मोठी कारवाई

आळंद देऊळगाव राजा शेत हद्द वादातून कुऱ्हाड हल्ला मराठी बातमी

आळंदमध्ये कुऱ्हाड-खुरप्याने रक्तरंजित हल्ला! शेत हद्दीच्या वादातून दोन शेतकरी जखमी, एकमेकांवर गुन्हे दाखल

अंढेरा येथे तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस तपास सुरू

अंढेरा येथे पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; पत्नी व प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

दुसरबीड शेळी चोरी प्रकरणात 3 आरोपी अटक

शेळ्या चोरून विक्रीसाठी निघाले… पण अवघ्या 12 तासांतच पोलिसांच्या तावडीत अडकले 3 आरोपी

बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे 23 जुलै 2026 रोजी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बंदची घोषणा

Buldana news : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ 23 जुलैला साखरखेर्डा बंद

एअरबॅगमुळे 75 वर्षीय वकिलाचा जीव वाचला; मेहकर येथे आयशरच्या धडकेत कारचा चक्काचूर

मेहकरमधील ज्येष्ठ वकिलाच्या कारला भरधाव आयशरची समोरून धडक; भीषण अपघातात कारचा चक्काचूर

Leave a Comment