बुलढाणा: महाराष्ट्रातील आगामी नगरपालिका निवडणुका राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत भाजपचा प्रभाव अधिक मजबूत करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चारही भाजप आमदारांना थेट जबाबदारी सोपविली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, “नगरपालिका असो वा शहर – नगराध्यक्ष हा आमचाच हवा!”
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, मलकापूर, चिखली, जळगाव-जामोद, सिंदखेडराजा, शेगाव आणि इतर नगरपालिकांमध्ये यावेळी भाजप आपले वर्चस्व आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आमदारांवर जबाबदारी आणि दबाव दोन्ही वाढला आहे.
मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
भाजपाचे जिल्ह्यातील आमदार – ना. आकाश फुंडकर (खामगाव), आ. चेषणसुख संचेती (मलकापूर), आ. डॉ. संजय कुटे (जळगाव जामोद), आ. श्वेता महाले (चिखली) यांना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले की, नगराध्यक्ष पद तुमच्या मतदारसंघात भाजपाचाच हवा.
नगराध्यक्ष पदासाठी मुलाखती जोरात
भाजपाच्या विविध शहरांमध्ये संघटनात्मक बैठकांना वेग आला आहे. संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून सामाजिक समीकरण, जनाधार, आर्थिक तयारी, कार्यकर्त्यांची स्वीकार्यता या सर्वांचा बारकाईने विचार केला जात आहे.
पक्षश्रेष्ठींकडून असे संकेत आहेत की, मुलाखत दिल्यानेच उमेदवारी निश्चित होणार नाही. अंतिम निर्णय हा आमदारांच्या शिफारशीवर आणि स्थानिक गणितावर आधारित असेल.
जिल्ह्यात निवडणुकीची रंगत वाढणार
नगरपालिका निवडणुकीत यावेळी केवळ उमेदवार नव्हे, तर आमदारांचा मान-प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने प्रत्येक मतदारसंघात राजकीय समीकरणं अधिक रोचक बनली आहेत.
प्रदेशभरात एकच चर्चा सुरू आहे — कोण होणार नगराध्यक्ष?
हे पण वाचा.
ताज्या राजकीय अपडेट्स, न्यूज आणि ब्रेकिंग घडामोडींसाठी – Kattanews.in ला आत्ताच भेट द्या.










