हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धरण पायथ्याशी गाव, तरीही पाण्यासाठी भटकंती! लिंगा (साखरखेर्डा) गावकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

On: March 15, 2026 10:00 AM
Follow Us:
लिंगा साखरखेर्डा गावात पाण्याची तीव्र समस्या; धरण पायथ्याशी असूनही नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

साखरखेर्डा (वार्ताहर)|१५ मार्च २०२६ : सिंदखेडराजा तालुक्यातील लिंगा (साखरखेर्डा) गावात धरण पायथ्याशी पाणी असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवण भटकंती करावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जलसंधारण योजनेतून मंजूर झालेल्या नळयोजनेचे काम चार वर्षांपासून सुरू असूनही अद्याप गावात नियमित पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

पांग्रीकाटे – लिंगा ही गट ग्रामपंचायत असून लिंगा गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलसंधारण योजनेतून नळयोजना मंजूर करण्यात आली होती. मात्र या योजनेच्या कामात अनेक अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विहिरीचे बांधकाम उशिरा होणे, पाइपलाईन टाकताना झालेली चालढकल, वीजपुरवठ्याचा अभाव आणि पाइपलाईनमध्ये झालेल्या तांत्रिक अडचणी यामुळे पाणीपुरवठा सुरू होण्यास मोठा विलंब होत आहे.

लिंगा (साखरखेर्डा) गाव शेंदुर्जनपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या पायथ्याशी राजेगाव तलाव असून या तलावात मुबलक पाणीसाठा आहे. या तलावातून अनेक गावांची तहान भागवली जात असतानाही लिंगा गावातील नागरिक मात्र पाण्यासाठी त्रस्त असल्याचे चित्र आहे.

गावातील सुमारे ५० टक्के दलित कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागते. गावात खासगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असून एका ड्रमसाठी सुमारे ७० रुपये मोजावे लागत आहेत. शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना दररोज १०० ते २०० रुपये पाण्यासाठी खर्च करावे लागत असल्याने ग्रामस्थ आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

दरम्यान, राज्यात ‘घरघर नळ’ योजनेची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी होत असताना सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक गावे अजूनही पाण्यासाठी तडफडत असल्याचे चित्र आहे. विविध नळयोजना मंजूर होऊनही प्रशासनाच्या अनास्थेमुळे काही योजना वांझोट्या ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

धरणात पाणी असूनही गावात पाणीपुरवठा होत नसल्याने याला जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. लिंगा गावात तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा जनार्दन श्रीराम बोरकर, मधूकर भालेराव, गजानन भालेराव, रामचंद्र चेके, आनंदा भालेराव, संजय मानवतकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


Related News


👉 आपल्या भागातील ताज्या बातम्या, सरकारी योजना आणि नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी Kattanews.in नियमित वाचा.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

massive fire at jaystambh chowk chikhli buldhana shops burnt in market area

चिखली हादरली! मध्यवर्ती जयस्तंभ चौकात भीषण आग; काही मिनिटांत 6 दुकाने जळून खाक

समृद्धी महामार्गावरील लोखंडी जाळी चोरीप्रकरणी तिघांना किनगाव राजा पोलिसांनी अटक

समृद्धी महामार्गावर लोखंडी जाळी चोरी प्रकरण उघड; मनसे तालुका अध्यक्षासह तिघे अटकेत, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

मोहाडी गावाजवळ पाझर तलाव परिसरात बिबट्या आढळला

बुलढाणा : मोहाडी पाझर तलावात बिबट्याचा वावर; पाणी पिताना दिसताच ग्रामस्थांनी लाठ्या-काठ्यांनी हाकलला

Congress protest in Chikhli against LPG gas cylinder price hike women cooking on traditional stove

चिखलीत गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; तहसीलदारांना घेराव, महिलांनी चुल पेटवून केला संतापाचा निषेध

चिखली बसस्थानकावर सैलानी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी

सैलानी यात्रेसाठी हजारो भाविक चिखलीतून प्रवास; बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याच्या सुविधेची मागणी

बुलढाणा जिल्ह्यात 24 तासांत 6 तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना

बुलढाणा हादरलं! अवघ्या 24 तासांत 6 तरुणी बेपत्ता; 12 वीची विद्यार्थिनीही गायब

Leave a Comment