latest news in marathi : लग्नाच्या आठव्याच दिवशी सेल्फी घेताना नवविवाहितेचा मृत्यू. मोबाईल हा आता जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सतत मोबाईल हा माणसाच्या जवळ असतो, कुठलेही काम करताना आपण मोबाईलचा वापर करत असतो. दिवसेंदिवस मोबाईलचा वापर करणे हा हानिकारक ठरत आहे. कुठल्याही ठिकाणी गेलो असता सेल्फी काढणे हा एक नवीन ट्रेंडच बनला आहे. आपण ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणचा दृश्य हे मोबाईल बंद करतो. अशाच सेल्फी काढण्याच्या नादामध्ये एका महिलेला आपला जीव गमववा लागला आहे .
सविस्तर वृत्त असे की धाराशिव जात जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तूळ) येथील नवविवाहिता नळदुर्गच्या किल्ल्यातील बुरुजावर सेल्फी घेत असताना सुटलेल्या वाऱ्यात तोल जाऊन सुमारे शंभर फुटावरून खाली कोसळली.या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली आहे. एक तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तूळ) येथील अमीर महेबूब शेख यांच्याशी तुळजापूर तालुक्यातील राकेल या गावातील त्यांच्या मामाची मुलगी निलोफर (२२) हिचा २० मे रोजी विवाह झाला होता.
विवाहानंतर हे नवदाम्पत्य सोबतीला भाचा इरफान कासीम शेख, मित्र सचिन भगवान सिरसाठ हे नळदुर्ग येथील किल्ल्यावर पर्यटनासाठी गेले होते.दरम्यान,सकाळी अकरा वाजता किल्ल्यातील उपल्या बुरुजावर हे सर्वजण फोटोसेशन करीत होते. निलोफर याही फोटो काढून घेत होत्या. निलोफर यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या.
लग्नाच्या आठव्याच दिवशी गाठले मृत्यूने.
latest news in marathi
मयत निलोफर यांचे २० मे रोजी लग्न झाले होते. विवाहाला आठही दिवस पूर्ण झाले नाही तोच मृत्यूने त्यांना गाठल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या बुरुजावरून त्या खाली पडल्या, तो उपल्या बुरुज सुमारे १०० फूट उंचीचा आहे. वर जाण्यासाठी ७७ पायऱ्या चढाव्या लागतात. अकस्मात आलेल्या वाऱ्याने निलोफरचा घात झाला.