buldhana news | रेती माफियांची मुजोरी; तहसीलदारांना धमकी

buldhana news
buldhana news

 

 

 

 

 

 

 

buldhana news : जिल्ह्यामध्ये सध्या रेतीमाफी याचे मुजोरी सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी अवैधरित्या रेतीचे खनन केले जात आहे. यामध्ये कोणी आडवा आल्यास त्यास धाक दिला जातो त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागाने रेती माफियांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. मेहकरच्या तहसीलदारांनी रेतीची अवैध वाहतूक करणारी वाहने जप्त करून पोलिस ठाण्यात लावली आहेत. त्यामुळे चवताळलेल्या एका रेती माफियाने तहसीलदारांच्या घरासमोरच फेऱ्या मारल्या. एवढेच नव्हे तर तहसीलदारांबरोबरच वाद घातला त्यांना निवासस्थानात जाण्यापासूनही रोखले. या प्रकरणी तहसीलदारांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

मेहकरचे तहसीलदार नीलेश मडके यांनी गत दोन आठवड्यांपासून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई सुरू केली आहे. अनेक वाहने जप्त करून ती मेहकर पोलिस ठाण्यात लावली आहेत. त्यामुळे चवताळलेल्या रेती माफियांनी तहसीलदारांवर पाळत ठेवणे सुरू केले यांच्या शासकीय निवासस्थानासमोर एकजण फेऱ्या मारत होता. तहसीलदारांना त्यांच्या पत्नीने सांगितल्यानंतर ते तातडीने निवासस्थानी पोहोचले.

 

 

त्यांनी फेऱ्या मारणाऱ्यास विचारणा केली असता, त्याने गजानन मनोहर इंगळे , मेहकर) असे नाव सांगितले तसेच रेतीची अवैध वाहतूक करणारी वाहने जप्त का केली? यावरून तहसीलदारांशी वाद घातला.आपण योगेश राजेंद्र काटकर व मोहन राजेंद्र काटकर (दोघेही रा. मेहकर) यांच्या सांगण्यावरून तुमचा तीन दिवसांपासून पाठलाग करत असल्याचे सांगितले.

 

तहसीलदारांशी इंगळे याने वाद घातला तसेच त्यांना शासकीय निवासस्थानी जाण्यापासून रोखले. तहसीलदार मडके यांनी या प्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गजानन मनोहर इंगळे, योगेश राजेंद्र काटकर, मोहन राजेंद्र काटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.