
नांदुरा येथील तरुणीशी इंस्टग्रामवर instagram ओळख करून १९ वर्षीय तरुणीवर धमकी देत केला बलात्कार ! २ वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर instagram झालेल्या ओळखीतून बदनामीची धमकी देत शहरातील एका १९ वर्षीय विद्यार्थीनीचे शेगाव shegaon येथील लॉजवर नेवून लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार ३० जुलै रोजी घडला आहे. या प्रकरणी पीडीतेने नांदुरा पोलिस ठाण्यात nandura police station फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
‘ओम नितीन वाकुडकर’ om nitin vakudkar वय २१ रा. माळेगांव गोंड असे आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या बाबत प्राप्त माहितीनुसार, बि. कॉम. प्रथमवर्गाला शिक्षण घेत असलेल्या शहरातील एका १९ वर्षीय विद्यार्थीनीची ओळख २ वर्षांपूर्वी तालुक्यातील माळेगांव गोंड येथील ओम नितीन वाकुडकर om nitin vakudkar वय २१ याचे सोबत इंस्टाग्रामवर instagram झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघे जण फोन वर सतत बोलत असत. मात्र दोन दिवसांपासून पीडीतेने आरोपी सोबत बोलणे बंद केले.
त्यामुळे ३० जुलै रोजी आरोपीने पीडीतेला ‘मला तुझे सोबत बोलायचे आहे’ असे सांगून तिला भेटायला बोलावलं आणि तिला बदनामीची भीती दाखवून दूचाकीवर बसवून तीला शेगाव येथील श्रीहरी लॉज वर नेवून तिचे इच्छेविरुध्द बळजबरीने तिचे लैंगीक शोषण केले. या घटनेनंतर पीडीतेने नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी ओम नितीन वाकुडकर om nitin vakudkar याचे विरूध्द कलम ८७,६४, (२) (एम), ३५१ (२) बी एन एस अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. अटकेनंतर त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लिंगाडे हे करीत आहेत.