maharashtra homeguard | होमगार्डच्या ९ हजार रिक्त जागांची भरती.

maharashtra homeguard
maharashtra homeguard

 

maharashtra homeguard : राज्यात गृहरक्षक दलात (होमगार्ड) रिक्त असलेल्या नऊ हजार जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. काही गुणांनी पोलिस भरती हुकलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात संधी दिली जाईल. तसेच होमगार्डचा आहार भत्ता वाढविण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार यांनी दिली. कोल्हापुरातील गृहरक्षक दलाच्या कार्यालयास सोमवारी (दि. २७) भेट देऊन त्यांनी कामांचा आढावा घेतला.

 

राज्यात गृहरक्षक दलासाठी ५४ हजार जागा मंजूर आहेत. त्यापैकी ९ हजार जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे. यासाठी रिक्त जागांची भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे, असे रितेश कुमार यांनी सांगितले. नवीन पदभरतीची अंतिम मंजरी मिळताच पढील प्रक्रिया सरू होईल. सध्या होमगार्डना कामाच्या दिवसाचे ६७० रुपये मानधन दिले जाते, तर १०० रुपये आहार भत्ता दिला जातो.

 

आहार भत्ता वाढवण्याची मागणी सुरू होती. त्यानुसार आहार भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, लवकरच यात वाढ होईल, असा विश्वास रितेश कमार यांनी व्यक्त केला.

 

आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण देणार.| maharashtra homeguard

 

होमगार्डना आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेषतः पुरस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, त्यांना पाण्यातून बाहेर काढणे, मदत केंद्रांची उभारणी करणे या कामांचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना रितेश कुमार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार होमगार्डना प्रशिक्षित केले जाणार असल्याची माहिती समादेशक तथा अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिली.

 

होईल. सध्या होमगार्डना maharashtra homeguard कामाच्या दिवसाचे ६७० रुपये मानधन दिले जाते, तर १०० रुपये आहार भत्ता दिला जातो. आहार भत्ता वाढवण्याची मागणी सुरू होती. त्यानुसार आहार भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, लवकरच यात वाढ होईल, असा विश्वास रितेश कमार यांनी व्यक्त केला.