Ladki Bahin Yojana चा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अखेर जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात Ladki Bahin Yojana अंतर्गत 1500 रुपयांचा सन्मान निधी उद्यापासून जमा होणार आहे.
राज्यभरातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आणि सर्वांच्या नजरा आता Ladki Bahin Yojana च्या ऑक्टोबर हप्त्याकडे लागल्या होत्या. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली असून महिलांना दिलासा मिळाला आहे.
आदिती तटकरे यांची मोठी घोषणा
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सांगितले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे. सर्व पात्र महिलांच्या आधार-संलग्नित बँक खात्यात निधी जमा केला जाणार आहे.”

तटकरे यांनी हेही नमूद केले की, जर महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर पुढील महिन्याचा हप्ता थांबू शकतो. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी तातडीने E-KYC करणे आवश्यक आहे.
हे पण वाचा.
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या महिलांची नावे यादीतून वगळली – तुम्ही आहात का?
ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी?
महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केलं आहे की, “माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा यासाठी eKYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. महिलांना E-KYC करताना आपला आधार क्रमांक तसेच वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक द्यावा लागतो.
E-KYC करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2025 आहे. ही प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावरून करता येते —
https://ladakibahin.maharashtra.gov.in
लाडकी बहीण योजनेचे दरमहा हप्ते
ही योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली असून, पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. तर ज्या शेतकरी महिला नमो शेतकरी महासन्मान योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना चा लाभ घेतात, त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 500 रुपये दिले जातात.
महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती
आदिती तटकरे म्हणाल्या, “ही योजना म्हणजे महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींना आर्थिक बळ देण्यासाठी Ladki Bahin Yojana अखंडपणे चालू राहील.”
महत्त्वाच्या सूचना
- ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता उद्यापासून खात्यात जमा होईल.
- पुढील हप्ता मिळवण्यासाठी E-KYC 18 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
- अधिकृत माहिती आणि अपडेटसाठी संकेतस्थळाला भेट द्या: ladakibahin.maharashtra.gov.in
















