हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

खापरखेड रेती घाटावर नियमांना तिलांजली! पोकलॅंडच्या साह्याने अवैध उत्खनन; महसूल विभागाच्या भूमिकेवर संशय

On: February 14, 2026 8:49 AM
Follow Us:
khaparkheda-illegal-sand-mining-lonar-buldhana-maharashtra
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

साखरखेर्डा |१३ फेब्रुवारी २०२६

लोणार तालुक्यातील खापरखेड रेती घाटावर अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोकलॅंड मशीनच्या साह्याने दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत असून संबंधित ठेकेदार वाहतूक पास न घेता ४० ते ५० टन रेतीची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याची माहिती पुढे आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रस्तावित गटाच्या व्यतिरिक्त इतर गटातूनही मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करण्यात आले आहे. शासकीय नियमांचे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही नियमबाह्य पद्धतीने उत्खनन सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले असून पर्यावरणीय धोका वाढला आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या या कामाकडे महसूल विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

१० टन क्षमतेच्या रस्त्यावरून ४० ते ५० टन वजनाचे रेतीचे टिप्पर भरधाव वेगाने धावत असल्याने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत किनगाव जट्टू ते खापरखेड दरम्यान बांधण्यात आलेला सिमेंट रस्ता धोक्यात आला आहे. सततच्या अवजड वाहतुकीमुळे रस्ता अल्पावधीतच उध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून या मार्गावरील अवजड वाहने थांबवावीत व ठेकेदाराने पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रस्तावित गटातून किती रेती काढण्यात आली याचे मोजमाप करण्यात यावे, तसेच इतर गटातून झालेले उत्खनन तपासून संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी आणि नियमबाह्य उत्खनन केल्याप्रकरणी त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे, अशी मागणी नौशाद शेख (माजी उपसरपंच, दूसरबीड़) आणि रामेश्वर काळुसे (देऊळगाव कोळ) यांनी महसूल आयुक्त अमरावती यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या अवैध रेती उत्खनन प्रकरणात प्रशासन कारवाई करणार का, की हा प्रकार असाच सुरू राहणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.


📢 आपल्या परिसरातील समस्या आम्हाला कळवा – Kattanews.in आपल्या आवाजाला न्याय देईल.


Related News:

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा एलसीबीने 21 आणि 17 घरफोड्या करणाऱ्या आरोपींना अटक

राजेशने केल्या २१ घरफोड्या, राजेंद्रच्या नावावर १७ गुन्हे! LCBच्या जाळ्यात तीन अट्टल चोरटे; ६.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोरेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर 2026 दरम्यान रेशन कार्ड व वारस नोंदींचे वितरण

गोरेगावात ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर 2026’ उत्साहात; रेशन कार्ड ते वारस नोंदींचे थेट वितरण

मेहकरात गस्तीदरम्यान पोलिसावर हल्ला BNS गुन्हा

मेहकरात गस्तीदरम्यान पोलिसावर हल्ला! गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की; तिघांवर BNS अंतर्गत गुन्हा

रिसोड तालुक्यात वाशिम महसूल कर्मचारी संघटनेची बिनविरोध कार्यकारिणी निवड सभा

महसूल कर्मचाऱ्यांची एकजूट! रिसोड तालुका कार्यकारिणी बिनविरोध निवडली, शारदा इंगळे अध्यक्ष

चिखली-बुलढाणा रोड अपघात हातणी जवळ ट्रकखाली चिरडून युवकाचा मृत्यू

चिखली-बुलढाणा रोडवर भीषण अपघात! परीक्षेला निघालेल्या 23 वर्षीय युवकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

रिसोड येथे राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार स्वीकारताना प्रमोद वाबळे गुरुजी

विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या प्रमोद वाबळे गुरुजींना राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार; रिसोडचा अभिमान वाढला

Leave a Comment