हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धक्कादायक! 10 हजारांची लाच घेताना खामगाव पंचायत समितीत ग्रामसेवक रंगेहात जेरबंद

On: April 3, 2026 9:08 AM
Follow Us:
खामगाव पंचायत समितीत ग्रामसेवक 10 हजारांची लाच घेताना ACB कारवाई
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

खामगाव (बुलढाणा) : बुलढाणा जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून खामगाव पंचायत समितीत ग्रामसेवकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर ACB ने सापळा रचून ही मोठी कारवाई केली. 10 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना ग्रामसेवक विजय माधव गवई यांना अटक करण्यात आली असून या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गारडगाव (ता. खामगाव) येथील ग्रामसेवक विजय गवई यांनी एका शेतकऱ्याकडे गावठाण जमिनीच्या नमुना 8अ नोंदीचा फेर रद्द करून अहवाल वरिष्ठांना पाठविण्यासाठी तब्बल 30 हजार रुपयांची मागणी केली होती. या मागणीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर ACB पथकाने 25 मार्च रोजी पडताळणी केली असता ग्रामसेवकाने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. तडजोडीनंतर 10 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले आणि 2 एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालय, खामगाव येथे लाच घेताना विजय गवई यांना रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अमरावती ACB चे पोलिस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच बुलढाणा ACB चे पोलिस उपअधीक्षक भागोजी चोरमले, पोलिस निरीक्षक विलास गुसिंगे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

सरकारी कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारे लाच मागितली जात असल्याने सामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.


👉 संबंधित बातम्या


📢 वाचकांसाठी आवाहन

अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या. बातमी आवडल्यास शेअर करा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आम्हाला कळवा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment