जिल्हा प्रतिनिधी – नारायणराव आरू पाटील, वाशिम
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील जांब (अढाव) गावात गेल्या अनेक वर्षांपासून मोबाईल नेटवर्कचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
डिजिटल युगात देश झपाट्याने पुढे जात असताना, या गावातील नागरिक मात्र अजूनही नेटवर्कअभावी मूलभूत सुविधा आणि डिजिटल सेवांपासून वंचित आहेत.
ग्रामपंचायतचे सरपंच सुधाकर पाटील अढाव यांनी अनेक वेळा प्रशासन आणि मोबाईल कंपन्यांकडे मागणी करूनही गावात अद्याप मोबाईल टॉवर बसवला गेला नाही.
गावकऱ्यांचा प्रशासनावर तीव्र रोष असून, सततच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आता सरपंचांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
सरपंच अढाव म्हणाले की, “जर एका महिन्यात गावात मोबाईल टॉवर बसवला नाही, तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे आमरण उपोषण करू.
हेही वाचा.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नोव्हेंबरमध्ये? 10 नोव्हेंबरपूर्वी लागू होणार आचारसंहिता!
त्याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील.”सध्या गावातील नागरिकांना फोन कॉल, इंटरनेट सेवा, तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण आणि शेतकऱ्यांना डिजिटल माहिती मिळण्यात प्रचंड अडचणी येत आहेत.
या परिस्थितीमुळे नागरिक त्रस्त असून, प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे.
जांब (अढाव) गावातील नेटवर्क समस्येचे निराकरण न झाल्यास संपूर्ण गाव एकवटून मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासनाने त्वरित मोबाईल टॉवर बसवून गावकऱ्यांना न्याय द्यावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे.










