honey trap : सुंदर तरुणीचा विडिओ कॉल ; आणि त्याला १ लाख ३९ हजाराचा चुना !

honey trap

honey trap : फेसबुकवरून मैत्री facebook friend झालेल्या तरुणीचा अश्लील व्हिडीओ कॉल video call आयटी कंपनीतील IT company अधिकाऱ्याला भलताच महागात पडला. कॉलचे व्हिडीओ रेकॉर्डिंग video call recording काढून त्या तरुणीने धमकावत दीड लाख रुपये उकळले. तसेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुलाबा kulaba पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 

 

 

कुलाब्यातील रहिवासी असलेले ४४ वर्षीय तक्रारदार हे आयटी कंपनीत प्रोसेस हेडपदावर आहेत. ११ जुलैला त्यांना अनुराधा पौडवाल नावाच्या अनोळखी तरुणीने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तक्रारदारांनी ती रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर तरुणीने तक्रारदाराकडून व्हॉट्सअॅप नंबर घेतला. व्हॉट्सअॅपवर तिने त्यांच्याशी गोड बोलत त्यांना जाळ्यात ओढले. १३ जुलैच्या रात्री तिने तक्रारदाराला व्हिडीओ कॉल केला. यावेळी त्यांना अश्लील चाळे करण्यास भाग पाडले. पुढे या कॉलचे ‘व्हिडीओ रेकॉर्डिंग व्हायरल’ करण्याची धमकी देत त्यांच्याकडून १ लाख ३९ हजार रुपये उकळले.