ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेसाठी दलाल सक्रिय ; एका दलाल महिलेवर गुन्हा दाखल…

ladki bahin yojana

ladki bahin yojana : संजय गांधी sanjay gandhi ,श्रावणबाळ shravanbal  ,लाडकी बहीण ladki bahin , आदी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंजूर करून देण्यासाठी निराधार, गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या वंदना म्हस्के vandana mhaske (रा. हातमाळी, ता., जि. छत्रपती संभाजीनगर) या महिलेवर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

 

महिलांनी तहसीलदार रमेश मुणलोड ramesh munlod यांच्यासमोर गान्हाणे मांडल्यानंतर त्यांनी स्वतः महिलांचे जबाब घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तलाठी विशाल मगरे vishal magre यांनी फिर्याद दिली. बंद झालेले अनुदान मंजूर करण्यासाठी व ‘लाडकी बहीण योजनेचा’ लाभ मिळून देण्यासाठी वंदना मस्के या गोरगरीब महिलांकडून पैसे उकळत होत्या. पैसे देऊनदेखील अनुदान खात्यावर जमा होईना म्हणून महिलांनी म्हस्के यांना विचारले असता त्या धमक्या देतात म्हपान महिलांनी तहसीलदारांकडे धाव घेतली होती. करमाडचे पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे pratap navghare यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रामेश्वर टाकणे rameshwar तपास करत आहे.

 

 

 

आरोपी महिला प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाध्यक्ष?

वंदना मस्के vandana mhase या महिलेने संजय गांधी, श्रावण बाळ योजना कार्यालयात प्रहार जनशक्त्ती prahar janshakti  पक्षाच्या जिल्हाध्यक्ष असल्याचे लेटर हेड वापरून योजना मंजूर करण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला आहे. शिवाय याच लेटरहेडचा वापर करून ती शासनाच्या विविध कार्यालयातून माहिती मागवत असते. प्रहारच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा संपर्क होऊ शकला नाही.