हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

गुंज मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; ४ आरोपी न्यायालयीन कोठडीत, सुरेश तुपकरांचा जामीन फेटाळला

On: April 8, 2026 8:18 AM
Follow Us:
गुंज मारहाण प्रकरणात ४ आरोपी न्यायालयीन कोठडीत, सुरेश तुपकर यांचा जामीन फेटाळला
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

साखरखेर्डा | ८ एप्रिल २०२६

गुंज येथील धक्कादायक आणि गाजलेले मारहाण प्रकरण आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून पोलिसांनी मोठी कारवाई करत चार आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख नाव असलेल्या माजी सभापती सुरेश तुपकर यांना न्यायालयाकडून मोठा झटका बसला असून त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साखरखेर्डा जवळील मौजे गुंज येथे शिवजयंती मिरवणुकीदरम्यान डिजेच्या आवाजावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला होता. हा वाद पुढे जाऊन तुंबळ हाणामारीत बदलला आणि या घटनेत पाच जण जखमी झाले होते.या घटनेनंतर दोन्ही गटांकडून परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एकूण १९ जणांविरोधात गुन्हा नोंदवला. सुरुवातीला एका आरोपीला अटक करण्यात आली होती, मात्र इतर आरोपी फरार झाले होते.तपासादरम्यान शाम सुरेश तुपकर, पवन परसराम तायडे आणि अक्षय रामकिशन तुपकर यांना २० मार्च रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने सुरुवातीला त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर २१ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू ठेवत १ एप्रिल रोजी अमोल सुरेश तुपकर, गजानन केशव तुपकर, ऋतिक गजानन तुपकर आणि कडूबा मनोहर तुपकर या चार आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर २ एप्रिल रोजी त्यांची बुलढाणा कारागृहात रवानगी करण्यात आली.

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा घडामोड म्हणजे माजी सभापती सुरेश माधवराव तुपकर यांनी मेहकर येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सहाय्यक सरकारी वकील विनोद नरवाडे पाटील यांनी ठोस युक्तिवाद करत जामीन देऊ नये अशी भूमिका मांडली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ७ एप्रिल रोजी तुपकर यांचा जामीन अर्ज फेटाळण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पोलिसांच्या तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.


📢 तुमच्या भागातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा

👉 अशाच अपडेट्ससाठी लगेच फॉलो करा KattaNews.in आणि ही बातमी तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.


🔗 संबंधित बातम्या

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment