विशाल गवई/चिखली
गुम्मी (ता. चिखली) येथे आज शुक्रवार, दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार संदीपपाल महाराज यांचे समाज प्रबोधनपर किर्तन होणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
राजकारण आणि समाजकारणाची सांगड घालत, दांडगे यांनी सामाजिक कार्याची नवी दिशा दिली आहे.
मनोज दांडगे यांनी मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची मालिका राबवली आहे. समाजातील एकोप्याला चालना देत, त्यांनी “मनोरंजनातून प्रबोधन” हा संदेश सातत्याने दिला आहे.
आज गुम्मी येथे होणारे संदीपपाल महाराजांचे किर्तन हे समाजातील व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता आणि एकात्मतेचा संदेश देणारे ठरेल.या कार्यक्रमातून पुन्हा एकदा समाजात सकारात्मकता आणि एकजुटीचा संदेश पोहोचणार आहे.
मनोज दांडगे यांनी सांगितले की, “या किर्तनाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या गावात सामाजिक जागरूकतेची नवी सुरुवात करावी.”










