हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मोठी अपडेट! सरकारी नोकरभरती परीक्षांचे शुल्क 50% करण्याची मागणी; लाखो विद्यार्थ्यांना मिळू शकतो दिलासा

On: March 10, 2026 5:26 PM
Follow Us:
MLA Shwetatai Mahale demand 50 percent चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले विधानसभेत नोकरभरती परीक्षांचे शुल्क कमी करण्याची मागणी करताना
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

चिखली| १० मार्च २०२६

महाराष्ट्रात सरकारी नोकरभरतीसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नोकरभरती परीक्षांचे शुल्क 50 टक्क्यांनी कमी करावे, अशी मागणी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी विधानसभेत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात बंद पडलेली शासकीय भरती पुन्हा सुरू करून तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिली असल्याचे सांगत त्यांनी सरकारचे अभिनंदनही केले.

विधानसभेच्या अधिवेशनात नियम 105 अंतर्गत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना आमदार महाले यांनी सांगितले की, महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात लिपिक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस शिपाई, अभियंता, डॉक्टर आणि नर्स यांसारख्या विविध पदांसाठी सुमारे 1 लाख 20 हजार पदांची भरती करण्यात आली आहे. तसेच चालू अर्थसंकल्पात महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि इतर यंत्रणांमार्फत आणखी 75 हजार पदांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.मात्र, या भरती प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांवर परीक्षा शुल्काचा आर्थिक भार पडत असल्याचा मुद्दा आमदार श्वेताताई महाले यांनी सभागृहात मांडला. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गातील अनेक विद्यार्थी ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातून येतात. सध्या सरकारी भरती परीक्षांसाठी खुल्या प्रवर्गासाठी सुमारे एक हजार रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी सुमारे नऊशे रुपये शुल्क आकारले जाते. म्हणजेच केवळ शंभर रुपयांची सूट दिली जाते.

हे शुल्क भरताना अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी नोकरीच्या परीक्षांसाठी शहरात येताना बसस्थानक, रेल्वे स्थानक किंवा फुटपाथवर मुक्काम करून परीक्षा देतात. अशा परिस्थितीत परीक्षा शुल्काचा अतिरिक्त भार त्यांच्यासाठी मोठी अडचण ठरतो, असेही आमदार महाले यांनी नमूद केले.

भारतीय संविधानाच्या कलम 16 नुसार सार्वजनिक रोजगारामध्ये संधीची समानता देण्यात आली आहे. मात्र मागासवर्गीय उमेदवारांकडून जवळपास खुल्या प्रवर्गाइतकेच परीक्षा शुल्क आकारले जात असल्याने संधीच्या समानतेच्या तत्वाला बाधा येत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय नोकरभरती परीक्षांचे शुल्क किमान 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी त्यांनी सभागृहाच्या माध्यमातून केली.

यावेळी त्यांनी भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी टीसीएस किंवा इतर संस्थांमार्फत परीक्षा घेतल्या जात असल्या तरी त्या प्रक्रियेवरील काही खर्च सरकारने उचलून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा, असेही सुचवले.

दरम्यान, आमदार श्वेताताई महाले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, भारतीय संविधानानुसार सर्वांना समान संधी मिळणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सध्या राज्यात पदभरतीच्या दोन पद्धती अस्तित्वात आहेत. गट अ, ब व क मधील पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते, तर गट ब अराजपत्रित, गट क व गट ड मधील पदांची भरती संबंधित विभागांमार्फत केली जाते.

या दोन वेगळ्या यंत्रणांमुळे परीक्षा शुल्काचे दर वेगवेगळे आकारले जात होते. विद्यार्थ्यांना एकाच प्रकारच्या पदासाठी अनेक विभागांच्या वेगळ्या परीक्षा द्याव्या लागत होत्या. त्यामुळे त्यांच्यावर वेळ आणि पैशांचा अनावश्यक भार पडत होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने चार महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

या निर्णयांमध्ये एमपीएससीच्या कक्षेबाहेरील पदांची भरती टप्प्याटप्याने एमपीएससीमार्फत करणे, परीक्षा शुल्काचे दर एमपीएससीकडून निश्चित करणे, समान स्वरूपाच्या पदांसाठी परीक्षा एकत्रित करणे आणि विविध विभागांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये एकसूत्रता आणणे यांचा समावेश आहे. या निर्णयांमुळे ग्रामीण व मागासवर्गीय प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना पारदर्शक व सुलभ पद्धतीने संधी उपलब्ध होईल, असे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.


Related News


हे आवश्यक करा

अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. स्थानिक, राजकीय, गुन्हेगारी आणि समाजातील महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा.

 

सुनिल अंभोरे

सुनिल अंभोरे हे आपल्या न्यूज नेटवर्कचे विश्वासार्ह आणि सक्रिय वार्ताहर असून ग्रामीण, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करतात. स्थानिक पातळीवरील घडामोडी अचूक, निष्पक्ष आणि तथ्यांच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करण्यावर त्यांचा भर आहे. बातमी लेखनात पारदर्शकता, विश्वसनीय स्रोत आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा

साखरखेर्ड्यात महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; “स्त्री शक्तीचा सन्मान हीच खरी ओळख” – वर्षाताई उगलमुगले

भाजप नेते लखनसिंह ठाकुर यांनी निजामपूर गावाचे नाव बदलून श्रीरामपूर करण्याची मागणी केली

निजामपूरचे नाव बदलणार? ‘श्रीरामपूर’ करण्याची भाजप नेते लखनसिंह ठाकुर यांची मोठी मागणी

खामगाव येथील सर्पमित्र मंगेश कांबळे यांचा मण्यार सापाच्या दंशाने मृत्यू

“सापाला जीवदान देताना सर्पमित्राचा मृत्यू!” खामगावमध्ये मण्यारच्या दंशाने 33 वर्षीय युवकाचा अंत

Short circuit causes wheat crop fire in Mera Budruk village Chikhli farmers controlling the fire

चिखली तालुक्यात धक्कादायक घटना! शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला आग; शेतकऱ्यांच्या धाडसामुळे वाचला 30 एकर पिकाचा पट्टा

रिसोड नगर परिषदेत कर भरल्यानंतर पावत्या कॅन्सल केल्याची चर्चा

रिसोड नगर परिषदेत ‘कर भरा-पावती घ्या आणि नंतर कॅन्सल’ घोटाळा? दीड वर्षांपासून सुरू असल्याची चर्चा, प्रशासन मौन

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिरातील लग्न सोहळ्यात भीतीचे वातावरण

लग्नाच्या मंडपात अचानक मधमाश्यांचा हल्ला; आनंदाच्या वातावरणात उडाली भीतीची धावपळ, 7 जखमी

Leave a Comment