fraud : सोशल मीडिया वरची मैत्री डॉक्टर तरुणीला पडली चक्क २८ लाखात

fraud

fraud : सोशल मीडियावरील मैत्री एका डॉक्टर महिलेला २८ लाखाला पडली आहे. या विदेशी व्यक्तीला कस्टमच्या तावडीतून सोडवण्याच्या प्रयत्नात त्यांनी ही रक्कम गमावली आहे. याप्रकरणी त्यांनी तक्रार केली आहे. पनवेल panvel परिसरात राहणाऱ्या डॉक्टर महिलेसोबत प्रकार घडला आहे. या महिलेची सोशल मीडियाद्वारे एका विदेशी व्यक्तीसोबत ओळख झाली होती. या व्यक्तीने तो डॉक्टर असून घटस्फोटित असल्याचे सांगितले होते.

 

 

 

त्या व्यक्तीने आपण मुलासह भारतात येत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काहीच दिवसात त्या व्यक्तीने ‘दिल्ली विमानतळावर’ अडकलो असून आपल्याला कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले असल्याचे सांगितले. आपल्यासोबत विदेशी चलन असून ते सोडवण्यासाठी कारवाई टाळण्यासाठी त्याने डॉक्टर महिलेकडे’ मदत मागितली. सोशल मीडियाद्वारे झालेल्या मित्राबद्दल सहानुभूती दाखवत या महिलेने कस्टम अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे वेगवेगळ्या खात्यावर २८ लाख रुपये भरले. त्यानंतर मात्र अधिक पैशाची मागणी होऊ लागल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.