Pune stunt girl | हाताची पकड तपासणीसाठी पुण्यातील तरुणीचा जीवघेणा स्टंट.

pune girl Stunt
pune girl Stunt

 

 

Pune stunt girl : पुणे शहरातील पुणे-बंगळुरू महामार्गावरील एका गोलाकार इमारतीवर एक तरुण व तरुणी हाताची पकड तपासण्यासाठी इमारतीवरून लटकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. काहीतरी वेगळे करून प्रसिद्धी मिळविण्यासाठी या दोघांनी तीन व्हिडीओग्राफरदेखील त्यांच्याबरोबर ठेवल्याचे व्हिडीओवरून स्पष्ट होते.हा व्हिडिओ तीन महिन्यांपूर्वीचा असून, पोलिस तरुण-तरुणीचा शोध घेत आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

हा व्हिडीओ पुणे-बंगळुरू महामार्गाजवळील एका पडीक इमारतीवर शूट करण्यात आला आहे. या पडीक इमारतीवर चढून तरुण आणि तरुणी स्टंटबाजी करताना दिसत आहेत. ‘ग्रीप स्ट्रेंथ चेक’ म्हणजेच हाताची पकड किती घट्ट आहे, हे तपासण्यासाठी स्टंटबाजी करत असल्याचे कॅप्शनमध्ये लिहून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.हा परिसर स्वामीनारायण मंदिराजवळ आहे. अनेकांनी या व्हिडीओवरून संबंधित तरुणीवर टीका केली आहे.