
t20 world cup 2024 : विठूरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या करकऱ्यांच्या दिंड्या पंढरीच्या दिशेने जात असतानाच गुरुवारी क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर wankhede stedium हजारो क्रिकेट भक्तांच्या दिंड्या येऊन थडकत होत्या. निमित्त होते अर्थातच विश्वविजेत्या क्रिकेटदेवांच्या दर्शनाचे.. विश्वविजेत्यांना याचि देही, याचि डोळा पाहण्याची धडपड आणि उत्साह प्रत्येकाच्या चेहन्यावर दिसत होता. मुंबईत पावसातही चाहत्यांचा जल्लोष कमी झालेला नव्हता.
वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस या बेटावर ‘टी-२० विश्वचषक’ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत आयसीसी जेतेपदाचा ११ वर्षांचा दुष्काळ संपवणारा भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला. राजधानी नवीं दिल्लीत संघाचे जल्लोषात स्वागत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी संघासाठी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर दुपारी सर्व खेळाडू मुंबईकडे रवाना झाले.
हार्दिक पांड्याची मागितली माफी
आयपीएल सामन्यांदरम्यान वानखेडे स्टेडियमवर मुंबईकर चाहत्यांनी हार्दिक पांड्याची यथेच्छ हर्यो उडवली होती. मात्र विश्वचषक स्पर्धेतील त्याचे अखेरचे षटक निर्णायचा उरल्यानंतर तसेच संपूर्ण स्पर्धेत त्याने केलेल्या चमकदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांनी हार्दिकची मनापासून माफी मागितली. डेव्हिड मिलरचा सीमारेषेवर अफलातून झेल पकडणाऱ्याा सूर्यकुमार यादवचाही जयघोष चाहते करत होते.