
robbery news : सिंदखेडराजा तालुक्यात येत असलेल्या परंतु साखरखेर्डा पोलिस ठाण्यांतर्गत sakharkherda police station असलेल्या शेवगां शिवारातील कोराडी प्रकल्पालगतच्या नदीपात्रामध्ये शेतकऱ्यांनी सिंचनासाठी लावलेल्या कृषी पंपांची तोडफोड केली. त्यातील लाखो रुपयांची तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली. जवळपास २० ते २५ शेतकऱ्यांच्या कृषिपंपामधील ही तांब्याची तार चोरण्यात आली आहे.
साखरखेर्डा पोलिस स्टेशन sakharkherda police station अंतर्गत शेवगा जहागीर shevga jahagir हे गाव कोराडी प्रकल्पाच्या बाजूला वसलेले आहे. या गावातील सर्वच शेतकऱ्यांच्या जमिनी दक्षिण भागात आहेत. कोराडीच्या पात्रातून शेतकऱ्यांनी जलवाहिनी टाकून सिंचनाची सोय केली आहे. प्रामुख्याने हे शेतकरी भाजीपालाघेतात. पावसाळा सुरू असल्याने या भागातील शेतकऱ्यांचे कृषिपंप बंद होते. दरम्यान ७ ऑगस्ट रोजी काही शेतकऱ्यांना त्यांच्या कृषिपंपाची फिटिंग काढून अज्ञात चोरट्यांनी त्यातील तारा लंपास केल्याचे निदर्शनास आले.
ही बाब गावात समजल्यानंतर अन्य काही शेतकऱ्यांनी त्यांच्या मोटारींची पाहणी केली असता २५ शेतकऱ्यांचे कृषिपंप फोडून त्यातील ‘तांब्याची तार’ चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या घटनेप्रकरणी बीट जमादार प्रवीण सुरळकर यांना माहिती देण्यात आली. या घटनेचे वृत्त लिहिस्तोवर साखरखेर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दरम्यान या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ८ ऑगस्ट रोजी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, हे प्रकरण चौकशीवर ठेवण्यात आल्याची माहिती आहे.