हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

डोणगावात ट्रिपला गेलेल्या डॉक्टरांच्या घरावर डल्ला; साडेदहा तोळे सोने लंपास

On: April 14, 2026 9:34 AM
Follow Us:
डोणगावात डॉक्टरांच्या बंद घरात चोरी; साडेदहा तोळे सोने लंपास

मेहकर कट्टा न्यूज|प्रतिनिधी 

डोणगावात धक्कादायक घरफोडी उघडकीस आली असून ट्रिपला गेलेल्या डॉक्टरांच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत साडेदहा तोळे सोने आणि चांदीचा मोठा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या मोठ्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही दिवस घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. गजानन पातुरकर हे ९ एप्रिल रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाट फोडून सोन्याच्या अंगठ्या, झुमके, नथ, गंठण तसेच चांदीच्या वस्तू चोरून नेण्यात आल्या.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या प्रकरणी पोलिसांनी सुमारे १ लाख ७३ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची नोंद केली आहे. मात्र, प्रत्यक्षात चोरीला गेलेल्या सोन्या-चांदीची किंमत यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे. जुन्या पावत्यांनुसारच किंमत नोंदवल्यामुळे तफावत निर्माण झाली आहे.

डोणगाव परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या असून अनेक प्रकरणांचा अद्याप तपास लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.


👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी kattanews.in ला रोज भेट द्या. ही बातमी शेअर करून इतरांपर्यंत जरूर पोहोचवा.


📢 हे पण वाचा..

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

नांदुरा येथील पूर्णा नदीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुर्यात शोककळा

साखरखेर्डा गट क्रमांक 870 जमीन प्रकरणात क्रीडांगणाची पाहणी करताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

साखरखेर्डा गट नं. 870 जमीन प्रकरण गाजले; बनावट फेरफार, भूमाफियांचा डाव? महसूल कलम 155 अंतर्गत कारवाईची मागणी

देऊळगाव राजा येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान व अन्नदान करताना

देऊळगाव राजात सेवाभावाचा आदर्श! पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान, अन्नदानाने जिंकली मने

साखरखेर्डा येथील बंद असलेला पशुवैद्यकीय दवाखाना

साखरखेर्ड्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; पशुवैद्यकीय दवाखाना कायम बंद, २५ गावांतील पशुपालक अडचणीत

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा; अवैध हातभट्टी दारू उद्ध्वस्त, दोन महिलांविरुद्ध गुन्हा

साखरखेर्डा येथील सरकारी ई-क्लास क्रीडांगणाच्या जमिनीवर जमलेले युवक

साखरखेर्ड्यात सरकारी ई-क्लास जमिनीवर डल्ला? क्रीडांगण नांगरून ताबा घेण्याचा प्रयत्न; युवक संतप्त

Leave a Comment