देऊळगाव राजा |मनोहर खंदारे
यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्याने देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करत, तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. जिल्ह्याची सरासरी पावसाची आकडेवारी न पाहता तालुकानिहाय पीक नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई व आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी मनसेने तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
याबाबत मनसे तालुकाध्यक्ष बंडूराजे डोळस यांनी तहसीलदारांकडे निवेदन दिले. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून तालुकानिहाय पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
जिल्ह्याची सरासरी पावसाची आकडेवारी न घेता तालुकानिहाय परिस्थितीचा विचार करावा, असे मनसेने म्हटले आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई आणि आवश्यक मदत मिळावी, यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली.
दरम्यान, देऊळगाव राजा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बंडूराजे डोळस यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी मनसे पदाधिकारी शहजाद भाई, नवनाथ रामाने, शहराध्यक्ष आकाश डोळस, सचिन विधाते, देवा गोरे, विशाल गोरे, देवा चव्हाण, अशोक खरात आदी उपस्थित होते.
📲 KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी WhatsApp group join करण्यासाठी click करा.
📢 तुमच्या गावातील बातमी आम्हाला पाठवा
तुमच्या परिसरात शेतकरी, शेती, पाऊस किंवा स्थानिक प्रश्नांशी संबंधित महत्त्वाची घटना घडली आहे का? फोटो, व्हिडिओ आणि माहिती KattaNews पर्यंत पोहोचवा. तुमच्या गावाचा आवाज अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या बातमी टीमशी संपर्क करा.
📰 संबंधित बातम्या
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी, पाऊस आणि स्थानिक प्रश्नांशी संबंधित ताज्या बातम्या वाचा.










