KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

नापिकी आणि कर्जाचे संकट; अंत्री खेडेकरच्या २५ वर्षीय तरुणाची मेरा बु. शेतशिवारात आत्महत्या

On: October 24, 2026 9:00 AM
Follow Us:
अंत्री खेडेकरच्या सचिन भिनये यांच्या मृत्यूची बातमी

कट्टा न्यूज नेटवर्क : समाधान सरकटे

सततची नापिकी आणि कर्जाची चिंता यामुळे अंत्री खेडेकर येथील २५ वर्षीय सचिन ज्ञानेश्वर भिनये यांचा मृत्यू झाला. मेरा बु. येथील शेतशिवारात झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. मंगळवार, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे अंत्री खेडेकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अंढेरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंत्री खेडेकर येथील रहिवासी सुनीता ज्ञानेश्वर भिनये यांच्या नावावर मेरा बु. शेतशिवारातील गट क्रमांक ११०९ मध्ये दीड एकर कोरडवाहू जमीन आहे. या जमिनीत त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. शेतीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या मेरा खुर्द शाखेतून ५० हजार रुपयांचे पीककर्ज घेतले होते.

मात्र, पावसाअभावी निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळाचा फटका सोयाबीन पिकाला बसला. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले आणि कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न कुटुंबासमोर निर्माण झाला होता, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी सचिन घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर मेरा बु. शेतशिवारात ही घटना घडल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील रामदास मोरे, माजी सरपंच बाळू पाटील, नाना खेडेकर, सचिन यांचे आई-वडील आणि नातेवाईक घटनास्थळी पोहोचले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंढेरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रुपेश शक्करगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा केला असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.

नापिकी आणि कर्जाच्या समस्येमुळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांसमोर निर्माण होणाऱ्या अडचणींचा प्रश्न या घटनेनिमित्त पुन्हा चर्चेत आला आहे.

📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या सर्वप्रथम मिळवा!

स्थानिक घडामोडी, शेती, बाजारभाव आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी कट्टा न्यूजच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

WhatsApp ग्रुप जॉइन करा ✅

हेही वाचा

मेरा बु. येथे ३५ वर्षीय शेतकरी पुत्राची आत्महत्या; नापिकी आणि कर्जबाजारीपणाची पार्श्वभूमी

चारित्र्याच्या संशयातून संसाराचा शेवट? दोन दिवसांपूर्वी दिले होते भांडण न करण्याचे आश्वासन; किनगाव राजात २३ वर्षीय विवाहितेचा मृत्यू, पती अटकेत

मलकापुरात इस्टेट ब्रोकरवर ॲसिड हल्ला; फोनवर बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फेकले ॲसिड

कट्टा न्यूज आवाहन: आपल्या परिसरातील महत्त्वाची बातमी, नागरिकांच्या समस्या किंवा सार्वजनिक हिताची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. सत्यापित माहिती आणि संबंधित तपशीलांसह आम्हाला संपर्क साधा.

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यात 90.75 टक्के मतदान

शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत; बुलढाण्यात 90.75% मतदान, कोण मारणार बाजी?

मेरा बु. येथील परमेश्वर राठोड आत्महत्या प्रकरणाची बातम

मेरा बु. येथे ३५ वर्षीय शेतकरी पुत्राची आत्महत्या; नापिकी आणि कर्जबाजारीपणाची पार्श्वभूमी

किनगाव राजा येथे संजीवनी दाभाडे मृत्यूप्रकरणी पतीला अटक

चारित्र्याच्या संशयातून संसाराचा शेवट? दोन दिवसांपूर्वी दिले होते भांडण न करण्याचे आश्वासन; किनगाव राजात २३ वर्षीय विवाहितेचा मृत्यू, पती अटकेत

मलकापुरात इस्टेट ब्रोकर राकेश तलरेजा यांच्यावर अॅसिड हल्ला

मलकापुरात इस्टेट ब्रोकरवर ॲसिड हल्ला; फोनवर बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फेकले ॲसिड

गिरोली बुद्रुकसह ग्रामीण महिलांचे कर्जवसुली थांबविण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

दुष्काळातही कर्जवसुलीचा तगादा? गिरोली बुद्रुकसह ग्रामीण महिलांचे तहसीलदारांना निवेदन

मेरा बु. येथे ५६ वर्षीय आयटीआय शिक्षकाचा मृत्यू; घटनेमुळे कवठळ आणि मेरा बु. परिसरात शोककळा.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मेहकरमधील ५६ वर्षीय ITI शिक्षकाची आत्महत्या; मेरा बु. येथील शेतात मृतदेह आढळल्याने परिसरात शोककळा

Leave a comment