KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

बुलढाणा: गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 21 वर्षीय तरुणाला जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार, पोलिसांची मोठी कारवाई

On: July 25, 2026 11:05 AM
Follow Us:
बुलढाणा धाड पोलीस स्टेशन हद्दपार कारवाई रोशन गणेश शिंदे

बुलढाणा|भागवत गायकवाड 

 बुलढाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. धाड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम रोशन गणेश शिंदे (वय 21, रा. धाड, जि. बुलढाणा) याला मा. पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांनी एक वर्षाच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

धाड पोलीस स्टेशन हद्दीत रोशन गणेश शिंदे याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला सातत्याने बाधा पोहोचत होती. स्थानिक पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याच्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होते. अखेर त्याच्या कृत्यांची गंभीर दखल घेत पोलीस स्टेशन धाड यांच्यामार्फत त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता.

सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाची सखोल पडताळणी केल्यानंतर, मा. पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 55(1) अन्वये रोशन गणेश शिंदे यास बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश पारित केला. या आदेशानुसार संबंधित इसमास आदेशाच्या कालावधीत जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास सक्त मनाई असणार आहे.

बुलढाणा पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर सातत्याने कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया प्रभावीपणे सुरू ठेवल्या जातील, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित व शांततामय वातावरण मिळेल.

या कारवाईमुळे धाड परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पोलीस प्रशासनाच्या या निर्णयाचे स्थानिक स्तरावर स्वागत होत आहे. परिसरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.


अधिक ताज्या बातम्यांसाठी Kattanews.in सोबत जोडलेले रहा.

📲 ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा

Join WhatsApp Group

संबंधित बातम्या

 

भागवत गायकवाड

भागवत गायकवाड हे KattaNews.in चे वार्ताहर असून बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील गुन्हेगारी, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, शेती आणि जनहिताच्या विषयांवर अचूक, विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ मराठी वृत्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यात 90.75 टक्के मतदान

शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत; बुलढाण्यात 90.75% मतदान, कोण मारणार बाजी?

मेरा बु. येथील परमेश्वर राठोड आत्महत्या प्रकरणाची बातम

मेरा बु. येथे ३५ वर्षीय शेतकरी पुत्राची आत्महत्या; नापिकी आणि कर्जबाजारीपणाची पार्श्वभूमी

किनगाव राजा येथे संजीवनी दाभाडे मृत्यूप्रकरणी पतीला अटक

चारित्र्याच्या संशयातून संसाराचा शेवट? दोन दिवसांपूर्वी दिले होते भांडण न करण्याचे आश्वासन; किनगाव राजात २३ वर्षीय विवाहितेचा मृत्यू, पती अटकेत

मलकापुरात इस्टेट ब्रोकर राकेश तलरेजा यांच्यावर अॅसिड हल्ला

मलकापुरात इस्टेट ब्रोकरवर ॲसिड हल्ला; फोनवर बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फेकले ॲसिड

गिरोली बुद्रुकसह ग्रामीण महिलांचे कर्जवसुली थांबविण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

दुष्काळातही कर्जवसुलीचा तगादा? गिरोली बुद्रुकसह ग्रामीण महिलांचे तहसीलदारांना निवेदन

मेरा बु. येथे ५६ वर्षीय आयटीआय शिक्षकाचा मृत्यू; घटनेमुळे कवठळ आणि मेरा बु. परिसरात शोककळा.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मेहकरमधील ५६ वर्षीय ITI शिक्षकाची आत्महत्या; मेरा बु. येथील शेतात मृतदेह आढळल्याने परिसरात शोककळा

Leave a comment