हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

देशसेवेची सुवर्णसंधी! CRPF-BSF-ITBP मध्ये 55 हजार मेगा भरती; 53 नवीन बटालियन प्रस्तावित

On: March 24, 2026 10:40 AM
Follow Us:
CRPF BSF ITBP CAPF 55000 recruitment 2026 government jobs India
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

Central Forces Recruitment 2026 : सरकारी नोकरी आणि देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी खुशखबर आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये (CRPF) तब्बल 55 हजार जवानांची मेगा भरती करण्याचा प्रस्ताव पुढे आला असून, या निर्णयामुळे देशभरातील लाखो उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, CRPF, BSF, ITBP आणि इतर दलांमध्ये 53 नवीन बटालियन स्थापन करण्याचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

CRPF मध्ये 22 हजार पदांची भरती

अहवालानुसार, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये 20 नवीन बटालियन तयार करण्यात येणार असून, त्यामुळे सुमारे 22 हजार जवानांची भरती केली जाणार आहे. यामुळे CRPF मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

इतर दलांमध्येही मोठी भरती

उर्वरित पदे BSF, ITBP, SSB आणि आसाम रायफल्समध्ये भरली जाणार आहेत. SSB मध्ये 12 बटालियन, BSF मध्ये 12 बटालियन आणि आसाम रायफल्समध्ये 5 नवीन बटालियन तयार करण्याचा प्रस्ताव आहे.

या सर्व प्रक्रियेनंतर एकूण 33 हजार जवानांची भरती इतर दलांमध्ये केली जाणार आहे.

युवकांसाठी मोठी संधी

देशसेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे. विशेषतः 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही भरती मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकते.

भरती प्रक्रिया मंजुरीनंतर लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरू करावी.

👉 सरकारी नोकरीच्या अशाच अपडेटसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये जॉईन व्हा!

Related News

 

समाधान वानखेडे

२५ वर्षांच्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या अनुभवासह समाधान वानखेडे ग्रामीण वास्तव, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी प्रकरणे आणि सामाजिक प्रश्नांवर अचूक, संतुलित व जबाबदार पत्रकारिता करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment