हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

शेगावात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा दौरा; २५–२८ फेब्रुवारी राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याची भव्य तयारी

On: February 25, 2026 7:47 AM
Follow Us:
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६ तयारीचे दृश्य

शेगाव (बुलढाणा) |२५ फेब्रुवारी २०२६

महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेगाव येथे प्रशासनाने पूर्वतयारीला वेग दिला असून २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६ साठी व्यापक व्यवस्था करण्यात येत आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी कार्यक्रम स्थळासह विविध ठिकाणांची पाहणी करून तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

कार्यक्रम स्थळ, हेलिपॅड, सुरक्षा व्यवस्था, रुग्ण व नागरिकांसाठी बसण्याची सुविधा, विविध पॅथींचे स्टॉल्स, औषध वितरण केंद्र आणि तपासणी कक्ष यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या तयारीबाबत समाधान व्यक्त करत नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.

२५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार असून राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा मेळावा बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानला जात आहे.

मेळाव्यादरम्यान दररोज मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक औषधांचे मोफत वितरण, ६६ औषधी स्टॉल्स आणि ३५ पेक्षा अधिक आरोग्य तपासणी स्टॉल्स नागरिकांसाठी उपलब्ध असतील.

२६ फेब्रुवारी रोजी आशा वर्कर्ससाठी “आजीबाईचा बटवा” प्रशिक्षण तसेच प्रगतशील शेतकऱ्यांसाठी वनौषधी लागवड, प्रक्रिया व विपणन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.

२७ फेब्रुवारी रोजी मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी होणार असून ‘वयोश्री’ आणि ‘एडीआयपी’ योजनेंतर्गत दिव्यांग बांधव व ६० वर्षांवरील नागरिकांसाठी तपासणी व साहित्य नोंदणी करण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.


नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा

  • मोफत आरोग्य तपासणी
  • मोफत औषध वितरण
  • नेत्र तपासणी व चष्मे वाटप
  • मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी
  • वनौषधी शेती मार्गदर्शन
  • दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना

हे पण वाचा..


📢 तुमच्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या.

 

सुनिल अंभोरे

सुनिल अंभोरे हे आपल्या न्यूज नेटवर्कचे विश्वासार्ह आणि सक्रिय वार्ताहर असून ग्रामीण, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करतात. स्थानिक पातळीवरील घडामोडी अचूक, निष्पक्ष आणि तथ्यांच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करण्यावर त्यांचा भर आहे. बातमी लेखनात पारदर्शकता, विश्वसनीय स्रोत आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

Leave a Comment