बुलढाणा | प्रा.दिलीप नाईकवाड
जिल्ह्यातील हजारो शेतकरी आजही पिकविम्याच्या पैशांची वाट पाहत असताना संतापाचा उद्रेक झाला आहे. 2023-24 खरीप व रब्बी हंगामासह 2024-25 रब्बी हंगामातील कांदा पिकाचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले, मात्र अनेक शेतकऱ्यांना अजूनही विमा मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत मोठा इशारा दिला आहे.
पांडुरंग पाटील यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, “लवकरात लवकर विमा रक्कम न मिळाल्यास जिल्हाभरातील सर्व विमा कार्यालये शेतकऱ्यांसह ताब्यात घेण्यात येतील.” या वक्तव्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
याआधी देखील प्रलंबित मागण्यांसाठी पाटील यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही प्रश्न सुटले नसल्याने यावेळी आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत देण्यात आले.
दरम्यान, येत्या पालकमंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्यात हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे आगामी काळात हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
या आंदोलनात वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे तालुका अध्यक्ष गोपाल गरड, राहुल मेहत्रे तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या Kattanews.in ला भेट देत रहा.










