किशन काळे/प्रतिनिधी
crime news : धारदार शस्त्रांनी गुप्तांगावर वार करून २८ वर्षीय विवाहित युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना वाशिम washim शहरात एका हॉटेलच्या बाजूला गुरुवार, २९ ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० ते ५:०० वाजताच्या सुमारास घडली. राहुल हिंमतराव वाघ rahul himmatrao wagh असे मृत युवकाचे नाव आहे.
याप्रकरणी मृताचे नातेवाईक दत्तराव गणेशराव देशमुख (रा. काटा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पत्नीचे भाचे राहुल व त्याचा लहान भाऊ कैलास हे दोघेही हिवरा गायकवाड (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील मूळ रहिवासी असून, ते काटा kata ` येथे स्थायिक झाले होते. राहुल विवाहित असून, त्याला दीड वर्षाची एक मुलगी आहे. तो वाशिम येथील डॉ. बिबेकर हॉस्पिटलमध्ये कम्पाउंडर म्हणून काम करीत होतो. गुरुवारी सायंकाळी दत्तराव देशमुख यांना काटा येथील बाळासाहेब शेषराव जाधव यांनी फोन करून तुमच्या भाच्याचा खून झाला असल्याची माहिती दिली.
‘काटा’ येथीलच रहिवासी कृष्णा सरनाईक krushna sarnaik यांना राहुलने फोनवर दिलेल्या माहितीवरून त्याचे भागवत धोंगडे, वैभव गुंजकर, सचिन कोठेकर, सागर मापारी, वीरेंद्र खडसे, गौरव गवळी, विश्वेश लेनगुटे (सर्व रा. वाशिम) यांच्याशी हॉस्पिटलजवळ मुलीच्या कारणावरून भांडण झाले होते. राहुलने प्रकरण आपसात मिटल्याने घरी जात असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर राहुलचा खून झाल्याची माहितीच नातेवाइकांना मिळाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रात्री उशिरापर्यंत सहापैकी पाच आरोपीला अटक केली होती.