
मागील महिन्यात मोहरम मध्ये झालेल्या दगडफेकि नंतर आता साखरखेर्डा येथे कावड उत्सवानिमित्त संचारबंदी ! काय आहे कावड उत्सव… मागील महिन्यात मोहरम ताजीया moharm tajiya मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीच्या प्रकारानंतर ठाणेदार स्वप्निल नाईक wapnil naik यांची तातडीने बदली करून त्यांच्या जागी यवतमाळ येथून गजानन करेवाड यांची येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान श्रावण मास ‘कावड’ kawad मिरवणुक उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ठाणेदार करेवाड यांनी कंबर कसली असून उपविभागीय दंडाधिकारी सिंदखेडराजा यांच्या आदेशानुसार संवेदनशील ठिकाणी संचारबंदीसह जमावबंदी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.जातीय दंगल घडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जाफ्राबाद मोहल्ला, गुजरी चौक, जामा मस्जीद, रोहीलपुरा, गीतांजली ले आउट, वॉर्ड क्रमांक सहा तांबोलीपुरा, नायकवाडी पुरा, बसस्थानक चौक या भागातील मिरवणूक वगळून दोन पेक्षा जास्त लोकांनी एकत्रितरीत्या फिरु नये, असा आदेश १२ ऑगस्टपासून लागू करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तथा उपविभागीय दंडाधिकारी, सिंदखेडराजा यांनी तसे आदेश दिले आहेत.
नागरिकांनी शांततेत सण उत्सव साजरे करावे
प्रभारी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह ८७ पोलिस कर्मचारी, ९५ होमगार्ड आणि १० पोलिस अधिकारी असा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरी नागरिकांनी एक दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करावा, असे ठाणेदार गजानन करेवाड म्हणाले.