
buldhana news : कोरोना जंतू… ते तलवारीने नातेवाइकांना केक भरवण्याच्या घटनांनी कायम चर्चेत राहिलेले शिंदेसेनेचे बुलढाणा buldhan येथील आमदार संजय गायकवाड sanjay gaikwad यांचे खासगी वाहन त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या समोर एक पोलिस कर्मचारी धूत असल्याचा व्हिडीओ गुरुवारी व्हायरल झाला. त्याच्या कमरेला रिव्हॉल्व्हर असल्याने तो आमदारांचा अंगरक्षक असावा, असा कयास आहे.
काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा!’ या टंग लाइनसह हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘महाराष्ट्र पोलिस दल यंत्रणा जनतेच्या सुरक्षेसाठी आहे की, आमदारांच्या गाड्या धुण्यासाठी?’ अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
चौकशी करणार : कडासने
व्हिडीओमधील पोलिस कर्मचारी नेमका कोण? हे स्पष्ट दिसत नसले तरी व्हिडीओ बघून चौकशी केली जाईल. बुलढाणा शहर पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांना यासंदर्भाने अहवाल मागितला आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने sunil kdasne यांनी सांगितले.
त्याने गाडीत उलटी केली होती
संबंधित कर्मचारी आदल्या दिवशी वॉरंटच्या कामानिमित्ताने शेगाव shegaon येथे गेला होता. त्याची रात्री झोप झालेली नसल्याने त्यास अॅसिडीटीचा त्रास होत होता, नाश्ता केल्यानंतर त्याने गाडीत माझ्या अंगावर उलटी केली. त्यानंतर मी घरी निघून गेलो. दरम्यान, वाहन चालक व त्या कर्मचाऱ्यामध्ये संवाद होऊन उलटी करणाऱ्याने गाडी साफ करावी, असे ठरले. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याने गाडी धुतली, पण या विषयाला वेगळे वळण दिले गेले.