रिसोड|५ एप्रिल २०२६
ही घटना दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 वाजता घडली. चिंचांबाभर येथील शेत शिवारात लिंबाच्या झाडाखाली दोन म्हशी बांधलेल्या होत्या. अचानक वीज कोसळल्याने दोन्ही म्हशींचा जागीच मृत्यू झाला.
महादेव सानप यांच्याकडे सुमारे 1 हेक्टर 60 आर जमीन असून शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय हा त्यांचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे. मृत झालेल्या म्हशी या दुभत्या असल्यामुळे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी तलाठी रवींद्र खंडारे तसेच पशुसंवर्धन अधिकारी अहिरे उपस्थित होते.
शेतकरी महादेव सानप यांनी प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली असून, या नुकसानीचा अहवाल तात्काळ वरिष्ठांकडे पाठवावा अशी विनंती केली आहे.














