हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखला घटनेचा निषेध पेटला; आज चिखली बंद, बाजारपेठ पूर्ण ठप्प

On: February 23, 2026 11:18 AM
Follow Us:
चिखली बंद आंदोलन बुलढाणा जिल्हा

चिखली |बुलढाणा जिल्हा |२३ फेब्रुवारी २०२६

लोणार तालुक्यातील चिखला येथे घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून आज दि. २३ फेब्रुवारी रोजी चिखली बंदची हाक देण्यात आली आहे. चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हटविण्याच्या प्रयत्नाला विरोध करणाऱ्या महिलांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध म्हणून सर्वपक्षीय आणि शिवप्रेमी नागरिकांनी बंदचे आवाहन केले आहे.

दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी गावातील सरपंच आणि काही व्यक्तींनी पुतळा हटविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी गावातील मराठा समाजातील महिला भगिनींनी विरोध दर्शविल्यानंतर त्यांच्यावर अमानुष मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभर उमटू लागले असून विविध स्तरांवरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने आज चिखली बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये शाळा, महाविद्यालये, दवाखाने, मेडिकल व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहणार आहेत.

सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये म्हणून शाळा बस व शैक्षणिक वाहने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

शहरातील नागरिकांनी शांतता राखून कुठेही अनुचित प्रकार घडू न देता बंद पाळावा आणि घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवावा, असे आवाहन सर्वपक्षीय प्रतिनिधी, चिखलीकर नागरिक आणि शिवभक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.


📢 आपले मत महत्त्वाचे आहे

या घटनेबाबत आपले मत काय? खाली कमेंट करून नक्की सांगा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.


🔗 संबंधित बातम्या

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान व अन्नदान करताना

देऊळगाव राजात सेवाभावाचा आदर्श! पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान, अन्नदानाने जिंकली मने

साखरखेर्डा येथील बंद असलेला पशुवैद्यकीय दवाखाना

साखरखेर्ड्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; पशुवैद्यकीय दवाखाना कायम बंद, २५ गावांतील पशुपालक अडचणीत

स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७ अंतर्गत सिंदखेडराजा येथे आयोजित जनजागृती अभियानातील पदाधिकारी

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पुन्हा रणशिंग; मिशन-२०२७ जनजागृती अभियानाला पश्चिम विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा; अवैध हातभट्टी दारू उद्ध्वस्त, दोन महिलांविरुद्ध गुन्हा

साखरखेर्डा येथील सरकारी ई-क्लास क्रीडांगणाच्या जमिनीवर जमलेले युवक

साखरखेर्ड्यात सरकारी ई-क्लास जमिनीवर डल्ला? क्रीडांगण नांगरून ताबा घेण्याचा प्रयत्न; युवक संतप्त

शिंदी गावात 24 तासांत तिघांचा मृत्यू; दोघांचा हृदयविकाराने तर एकाचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू

शिंदीत 24 तासांत तिघांचा मृत्यू; दोघांचा हृदयविकाराने तर एकाचा ब्रेन हॅमरेजने, गावावर शोककळा

Leave a Comment