हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखला काकड प्रकरण तापले : निरपराध ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घ्या, दोषींवर कारवाई करा — वंजारी समाजाची एकमुखी मागणी

On: February 24, 2026 10:58 AM
Follow Us:
चिखला काकड प्रकरणी वंजारी समाज बांधव निवेदन देताना
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

लोणार|बुलढाणा जिल्हा|२४ फेब्रुवारी २०२६

लोणार तालुक्यातील चिखला काकड प्रकरण सध्या चांगलेच तापले असून निरपराध ग्रामस्थांवर दाखल खोटे गुन्हे मागे घेण्याची आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. शिवजयंतीनंतर घडलेल्या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी एकमुखी मागणी वंजारी समाज बांधवांनी केली आहे.

प्रा. दिलीप नाईकवाड, बुलढाणा : जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात १९ फेब्रुवारी शिवजयंतीनंतर उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर २० जानेवारीच्या घटनेशी संबंधित कारवाईत निरपराध ग्रामस्थांवर दबावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यासंदर्भात वंजारी समाज बांधवांनी बिबी येथील ठाणेदारांना निवेदन देत निष्पक्ष तपासाची मागणी केली. या वेळी भाजप प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, डॉ. सुनील कायंदे, प्रभाकर ताठे, डॉ. गजानन घुले, सुनील केंद्रे, भगवान सानप, शिवसेना नेते सिद्धेश्वर आंधळे, अ‍ॅड. शिवाजी सानप, हिम्मतराव सानप, पाटील बुवा आंधळे, संतोष रणमाळे, तुळशीराम करपे, नागेश घुले, नामदेव मुळे यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्थित होते. महिला भगिनींचाही मोठ्या संख्येने सहभाग होता.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरून सुरू झालेल्या वादात गावातील सरपंच व काही महिलांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वस्तुस्थितीची पडताळणी न करता सामाजिक दबावाखाली कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांना संरक्षण देण्यात यावे, तसेच प्रकरणाची सीआयडी किंवा उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे, कारण चुकीच्या माहितीमुळे सामाजिक तेढ वाढण्याची शक्यता असल्याचे समाज बांधवांचे म्हणणे आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजासाठी पूजनीय असून त्यांच्या अवमानाला वंजारी समाज कधीही सहन करणार नाही, असे विनोद वाघ यांनी सांगितले. महाराष्ट्रात छत्रपतींच्या सन्मानासाठी समाजाने पूर्वीही संघर्ष केला असून पुतळे उभारण्यासाठी अनेक वेळा आंदोलन केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि निरपराध नागरिकांना त्रास देऊ नये, अशी एकमुखी मागणी समाज बांधवांनी केली आहे.


👉 Related News


📲 अधिक अपडेटसाठी

स्थानिक घडामोडींचे अचूक आणि विश्वासार्ह अपडेट्स मिळवण्यासाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Deulgaon Raja Water Park Accident युवक बुडून मृत्यू

देऊळगाव राजात धक्कादायक घटना! वॉटरपार्कमध्ये २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; सुरक्षेवर गंभीर प्रश्न

बुलढाणा जिल्ह्यात आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम

१४ एप्रिलपर्यंत ‘सामाजिक समता सप्ताह’; बुलढाण्यात सरकारी योजनांचा मोठा लाभ नागरिकांना

मलकापूरमध्ये नकली नोटा प्रकरणात पोलिसांची कारवाई करताना आरोपी अटकेत

मलकापुरात ‘१ लाख द्या, ९ लाख घ्या’ घोटाळा उघड! नकली नोटा टोळीचा पर्दाफाश; पोलिसांवरच प्रश्नचिन्ह

बुलढाणा मध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याचे दृश्य

रक्षकच भक्षक! पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; बुलढाण्यात खाकीची अब्रू धुळीस

महात्मा फुले आणि डॉ आंबेडकर जयंती कार्यक्रमात बोलताना प्रतापराव जाधव साखरखेर्डा

अनाठायी खर्चामुळे शेतकरी अडचणीत! फुलेंचे विचारच आहेत उपाय – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा मोठा संदेश

लोणीगवळी मेहकर शिक्षक लैंगिक छळ प्रकरणातील शाळेचा फोटो

मेहकर तालुक्यातील लोणीगवळी हादरलं! ५ ते ९ वर्षांच्या मुलींचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; गावात संतापाचा उद्रेक

Leave a Comment