हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा ७ वा वर्धापन दिन रिसोडमध्ये उत्साहात साजरा

On: January 3, 2026 1:18 PM
Follow Us:
भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा ७ वा वर्धापन दिन रिसोडमध्ये उत्साहात साजरा; शाहीर अविष्कार देशिंगे पोवाडा सादर करताना
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

रिसोड प्रतिनिधी/विजय जुंजारे 

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीत उत्साहात कार्यक्रम पार पडला. युवा शाहीर अविष्कार देशिंगे यांच्या पोवाड्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

विदर्भ आणि मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकरी, शेतमजूर आणि युवकांच्या समस्यांवर काम करणाऱ्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वर्धापन दिनाचे अध्यक्षतेखाली पार पडले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम रंगतदार झाला. यावेळी बाजार समितीचे उपसभापती, माजी सभापती, राज्य संघटक, जिल्हाध्यक्ष, महिला समन्व्यक, संचालक आणि तालुकाध्यक्षांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विष्णुपंत भुतेकर यांनी संघटनेच्या मागील सात वर्षांच्या कामांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांसाठी केलेले आंदोलन, मोर्चे, रस्तारोको, उपोषणे याची माहिती दिली. त्यांनी आश्वासन दिले की भूमिपुत्र शेतकरी संघटना संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभी राहील.

हे पण वाचा..

पांदण रस्ते शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय; मार्गी लावण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – आमदार अमित झनक.

महत्वाचे मुद्दे आणि उपक्रम

  • 25 वर्षांपासून रखडलेला पळसखेड लघु प्रकल्प अजून पूर्ण नाही; प्रशासकीय मान्यता असून 3 कोटी रुपये खर्च झाले.
  • पैनगंगेवर आधुनिक बॅरेज आणि शेती पंपांसाठी सोलरची अटी हटवून शेतकऱ्यांना ग्रीडवरून वीज जोडणी देणे आवश्यक.
  • भूमिपुत्र संघटना या मुद्यावर लढा उभारणार आहे.

सुप्रसिद्ध युवा शाहीर अविष्कार देशिंगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोवाड्यातून जिवंत केला. उपस्थितांच्या अंगावर शहारे आणणारा पोवाडा कार्यक्रमाची मुख्य आकर्षक ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र गवळी यांनी केले, तर आभार मानले महावीर पवार. कार्यक्रमाच्या यशासाठी शहराध्यक्ष आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment